26.6 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ चक्रवर्ती सम्राट राजाभोज जयंतीनिमित्त महारॅलीने दुमदुमले गोंदिया शहर

चक्रवर्ती सम्राट राजाभोज जयंतीनिमित्त महारॅलीने दुमदुमले गोंदिया शहर

0
70

गोंदिया,दि.२३:  पोवार समाजाचे आराध्य दैवत चक्रवर्ती सम्राट राजाभोज यांची जयंती वसंत पंचमी पर्वावर साजरी करण्यात येते. यंदाही वसंत पंचमीच्या पर्वावर शहरात चक्रवर्ती राजा भोज जयंती महोत्सव महारॅली समिती,पवार प्रगतीशील मंच गोंदिया,  फुलचूर, छोटा गोंदिया, मुर्री, कुडवा, सूर्याटोला येथील समित्यांच्या सयुंक्तवतीने आज २३ जानेवाराली गोंदिया शहरात भव्य महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते.फूलचूर व मुर्री येथून आलेल्या रॅलींचे स्वागत जयस्तंभ चौकात करण्यात आले.त्यापुर्वी पोवार साँस्कृतिक भवन येथील चक्रवर्ती राजा भोज यांच्या प्रतिमेला व जयस्तंभ चौकात माल्यार्पण करण्यात आले.त्यानंतर समाजातील लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.महारॅलीच्या सुरवातीला महिलांंनी लेझीमच्या माध्यमातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

सर्व संघटनांच्यावतीने हिंदी टाऊन शाळेतून रॅलीला सुरुवात करण्यात आली. ही रॅली जयस्तंभ चौक, गांधी प्रतिमा, गोरेलाल चौक, नेहरू चौक मार्गाने भ्रमण करत नेहरु चौकात परत येऊन रॅलीचा समारोप करण्यात आला.या रॅलीत हजारोच्या संख्येने समाजबंधु सहभागी झाले होते. मोठ्याप्रमाणात निघालेल्या रॅलीने शहरातील वाहतुक व्यवस्था पुर्णत विस्कळीत केली होती.दोन ते तीन किलोमीटर लांब अशी ही रॅली जयस्तंभ चौक,गांधी प्रतिमा,गोरेलाल चौक,नेहरु चौक,आंबेडकर चौक मार्ग हिंदी टाऊन शाळेत पोचली तर दुसरी रॅली ही नेहरु चौक,सिव्हील लाईन मामा चौक मार्ग छोटा गोंदिया येथे आयोजित कार्यक्रमस्थळी पोचली.blank
विशेष म्हणजे, या रॅलीने समाजातील एकतेचा संदेशही दिला. क्षत्रिय पोवार राजाभोज जयंती महोत्सव व वसंत पंचमी उत्सव समिती गोंदियाच्यावतीने क्षत्रिय पोवार राजाभोज यांच्या जयंतीनिमित्त महारॅलीचे आयोजन शुक्रवारी (दि.२३) करण्यात आले आहे. महारॅलीचे उद्घाटन पोवार महासभा अध्यक्ष नंदलाल चौधरी यांच्या हस्ते आ. विजय रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.यावेळी बालाघाट सिवनीचे खासदार भारती पारधी,आमदार मधु भगत, माजी खासदार ढालसिंह भगत, माजी आमदार हेमंत पटले,खोमेश्वर रहागंडाले,पवार प्रगतीशील संस्थेचे अध्यक्ष यु.टी.बिसेन,एड.टी.बी.कटरे,माजी जि. प. अध्यक्ष पंकज रहांगडाले, जि. प. बांधकाम सभापती लक्ष्मण भगत,नप उपाध्यक्ष संतोष पटले,सीताबाई रहागंडाले, माजी सभापती संजयसिंह टेंभरे, अर्पण बिसेन, केसरबाई बिसेन, दारासिंग कटरे, माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, डॉ. प्रशांत कटरे, मोतीलाल चौधरी,जिल्हा बँकेचे संचालक दुर्गाप्रसाद ठाकरे, माणिकचंद बिसेन, केतन तुरकर, विशाल बिसेन, डॉ. अजय पारधी, गुरूवेश येळे, पृथ्वीराज रहांगडाले, नंदुभाऊ बिसेन, कमलेश बिसेन, राहुल बिसेन, बाळकृष्ण पटले, नरेन्द्र ठाकरे,आयोजन समितीचे अध्यक्ष राजकुमार (पप्पू) पटले, सचिव देवचंद बिसेन, प्रवीण बिसेन, उमेश पारधी,राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे माजी संघटन सचिव खेमेंद्र कटरे,ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे,शिशिर कटरे,सुनिल पटले,महेंद्र बिसेन,भागचंद रहागंडाले,रवी पटले,दिलीप पारधी,पंकज पटेल,संजय ठाकरे,आशिष रहागंडाले, कृमराज चव्हाण,सुरेश पटले,शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश भक्तवर्ती,छोटू बिसेन, दुर्गेश रहांगडाले, सुभानराव रहांगडाले, पप्पू पटले, कुलदीप रिनाईत, सुरेश पटले ,किशोर भगत,संदिप रहागंडाले,राहुल बिसेन,युवा स्वाभीमानचे जितेश राणे,जितेश टेंभरे,अजाबराव रिनायत,डाॅ.घनश्याम तुरकर,संदिप तुरकर,नगरसेवक गोलु बिसेन,गणेश तुरकर,देवचंद बिसेन,कुणाल बिसेन,माजी सभापती मनोज बोपचे,दिलीप चव्हाण,बाजार समितीचे सभापती तेजेंद्र हरिणखेडे,गोंदिया पंचायत समितीचे सभापती मुनेश रहागंडाले,रवि अंबुले,रमेश अंबुले,अजित टेंंभरे, हजारो समाजबांधव उपस्थित होते.

blank