गोंदिया, दि.24 : भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवार दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी पोलीस मुख्यालय मैदान, कारंजा येथे सकाळी 9.15 वाजता ध्वजारोहण व संचलनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे.याप्रसंगी इंद्रनील नाईक राज्यमंत्री उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री गोंदिया यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
येथील नविन प्रशासकीय इमारतीत उविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांच्या हस्ते सकाळी 7.30 वाजता आणि जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते सकाळी 8.15 वाजता ध्वजारोहण होणार आहे.सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सोबत कोणतेही बॅग किंवा तत्सम वस्तू आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 वाजेपूर्वी किंवा 10 वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.





