गोंदिया, 25 जानेवारी 2026: मैक्स सुपर स्पेशियलिटी हॉस्पिटल, नागपूर यांनी गोंदिया येथील शारदा कॉलनी मधील रामायण हॉस्पिटलच्या सहकार्याने सीटीव्हीएस (हृदय शस्त्रक्रिया), गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी (पचनसंस्था) आणि ऑन्कोलॉजी (कर्करोग) या विभागांसाठी विशेष ओपीडी सेवा सुरू केल्याची घोषणा केली आहे. या ओपीडी सेवांचा उद्घाटन कार्यक्रम मैक्स सुपर स्पेशियलिटी हॉस्पिटल, नागपूर येथील डॉ. निलेश अग्रवाल (असोसिएट डायरेक्टर गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी) आणि डॉ. कवडू जवादे (कन्सल्टंट मीटीव्हीएस), डॉ. सौरभ पटले (प्रिन्सिपल कन्सल्टंट सर्जिकल ऑन्कोलॉजी) यांच्या उपस्थितीत पार पडला.
डॉ. निलेश अग्रवाल, डॉ. सौरभ पटले आणि डॉ. कवडू जवादे हे दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी सकाळी 11:00 ते दुपारी 2:00 या वेळेत प्राथमिक सल्ला आणि फॉलो-अप तपासणीसाठी उपलब्ध असतील.डॉ. निलेश अग्रवाल, असोसिएट डायरेक्टर सीटीव्हीएस, मैक्स सुपर स्पेशियलिटी हॉस्पिटल, नागपूर, म्हणाले, “गेल्या दहा वर्षांत हृदयशस्त्रक्रियेत मोठा बदल झाला आहे. त्यामुळे हृदयाच्या विविध आजारांवर आता रुग्णांना अधिक सुरक्षित, अचूक आणि प्रभावी उपचार उपलब्ध झाले आहेत. पारंपरिक ओपन-हार्ट शस्त्रक्कियेपासून ते आधुनिक मिनिमली इनव्हेसिव्ह आणि हायब्रिड पद्धतींपर्यंत, आजची हृदय शस्त्रक्रिया प्रत्येक रुग्णाची स्थिती, वय आणि एकूण आरोग्य लक्षात घेऊन केली जाते. आमचा भर केवळ शस्त्रक्रियेच्या यशावर नाही, तर लवकर निदान, योग्य वेळी उपचार, लवकर बरे होणे आणि दीर्घकालीन जीवनमान सुधारण्यावरही आहे. गोंदियातील या ओपीडीच्या माध्यमातून, रुग्णांना तज्ज्ञ हृदय शस्त्रक्रियेचा सल्ला सहज उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून त्यांना उपचारांसाठी दूर प्रवास न करता योग्य वेळी योग्य उपचार मिळू शकतील.”
डॉ. सौरभ पटले, प्रिन्सिपल कन्सल्टंट गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, हेपॅटोलॉजी आणि एंडोस्कोपी, मैक्स सुपर स्पेशियलिटी हॉस्पिटल, नागपूर, म्हणाले, “बेळेत निदान झाले तर पचनसंस्थेशी संबंधित अनेक आजार टाळता येतात. आमच्या नवीन गॅस्ट्रो ओपीडीच्या माध्यमातून प्रत्येक रुग्णाला सोयीस्कर, आधुनिक आणि काळजीपूर्वक उपचार देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. या ओपीडी सेवांमुळे रुग्णांना घराजवळच उच्च दर्जाचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी उपचार मिळतील आणि गरज असलेल्या रुग्णांना वेळेवर आणि प्रभावी उपचार मिळू शकतील.”
डॉ. कवडू जवादे, कन्सल्टंट सर्जिकल ऑन्कोलॉजी, मैक्स सुपर स्पेशियलिटी हॉस्पिटल, नागपूर, यांनी सांगितले, “कर्करोग उपचारांची सुरुवात वेळेवर लक्ष देणे आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने होते. सर्जिकल ऑन्कोलॉजी ओपीडीच्या माध्यमातून आम्ही रुग्णांना लवकर तपासणी, उपचारांच्या पर्यायांबाबत स्पष्ट माहिती आणि प्रत्येक टप्प्यावर आधार देण्याचा प्रयव करणार आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणि रोबोटिक शस्त्रक्रियेमुळे उपचार अधिक अचूक होतात, रुग्ण लवकर बरे होतात आणि सुरक्षित तसेच कमी शस्त्रक्रियात्मक उपचार शक्य होतात.”
गोंदियामध्ये या विशेष ओपीडी सेवा सुरू केल्यामुळे मैक्स सुपर स्पेशियलिटी हॉस्पिटल, नागपूरने मेट्रो शहरांव्यतिरिक्त इतर ठिकाणीही विशेष आरोग्यसेवा पोहोचवण्याची आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली आहे. या उपक्रमाचा उद्देश सीटीव्हीएस, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि सर्जिकल ऑन्कोलॉजीमध्ये लवकर निदान आणि तज्ज्ञ उपचार यांमधील अंतर कमी करणे हा आहे. यामुळे गोंदिया आणि आसपासच्या भागातील रुग्णांना दूर प्रवास न करता घराजवळच वेळेवर व उच्च दर्जाची उपचारसेवा मिळवणे शक्य होईल.
मैक्स हेल्थकेअर बद्दलः
मैक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूट लिमिटेड (मैक्स हेल्थकेअर) ही भारतातील सर्वात मोठ्या आरोग्य सेवा संस्थांपैकी एक आहे. ही संस्था उत्कृष्ट वैद्यकीय सेवा आणि आधुनिक तंत्रज्ञान व संशोधनाच्या सहाय्याने उच्च दर्जाची रुग्णसेवा प्रदान करण्यास वचनबद्ध आहे.
मैक्स हेल्थकेअर उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर कार्यरत असून, 20 आरोग्य सेवा केंद्रे (5200 वेड्सचे) चालवते, यामध्ये कंपनी आणि तिच्या उपकंपन्या, भागीदारीत असलेली आरोग्य केंद्रे आणि व्यवस्थापित आरोग्य सेवा केंद्रे यांचा समावेश आहे. या नेटवर्कमध्ये दिल्ली एनसीआर मधील साकेत (3) रुग्णालये), पटपडगंज, वैशाली, राजेंद्र प्लेस, द्वारका, नोएडा आणि शालीमार बाग येथे अत्याधुनिक श्रेणीची रुग्णालये आहेत. तसेच लखनऊ, मुंबई, नागपूर, मोहाली, बठिंडा, देहराडून येथे प्रत्येकी एक रुग्णालय आहे. याशिवाय गुरगाव आणि बुलंदशहर येथे दुय्यम आरोग्य केंद्रे तसेच नोएडा, लाजपत नगर (2 केंद्रे), पंचशील पार्क (दिल्ली एनसीआर) आणि मोहाली (पंजाब) येथे वैद्यकीय केंद्रे कार्यरत आहेत. मोहाली आणि बठिंडा येथील रुग्णालये पंजाब सरकारसोबत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप योजनेअंतर्गत चालवली जातात.
याशिवाय, मैक्स हेल्थकेअर “मैक्स होम” आणि “मैक्स लॅब्स” या ब्रेड नावांखाली होमकेअर आणि पॅथॉलॉजी सेवा देखील पुरवते. “मैक्स होम” घरीच आरोग्य आणि तंदुरुस्ती सेवा पुरवते, तर “मैक्स लॅब’ रुग्णालयाच्या बाहेर देखील निदान सेवा प्रदान करते.





