25.3 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ नवनिर्मित ‘महसूल अधिकारी निवासस्थानाचे’ पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन

नवनिर्मित ‘महसूल अधिकारी निवासस्थानाचे’ पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन

0
24
वाशिम,दि.२६ जानेवारी=जिल्ह्यातील प्रशासकीय सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उभारण्यात आलेल्या नवनिर्मित शासकीय निवासस्थानाचे उद्घाटन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आज दि.(२६) रोजी मोठ्या उत्साहात पार पडले.
उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उभारण्यात आलेल्या या शासकीय निवासस्थानामुळे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम होईल. अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक व सुरक्षित निवास सुविधा उपलब्ध झाल्यास नागरिकांना अधिक गतिमान, प्रभावी व गुणवत्तापूर्ण सेवा देणे शक्य होईल. पायाभूत सुविधा विकासाला शासनाने प्राधान्य दिले असून त्याअंतर्गत अशा इमारतींची उभारणी करण्यात येत आहे, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेकर यांनी नवनिर्मित शासकीय निवासस्थानाच्या बांधकामाची माहिती दिली. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून या इमारतीत आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित, प्रशस्त व सोयीस्कर निवास व्यवस्था निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
या उद्घाटन कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, पोलीस अधीक्षक अनुज तारे, भाप्रसे परिविक्षाधीन अधिकारी आकाश वर्मा, अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर तहसीलदार निलेश पळसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शुभम जोशी उपविभागीय अभियंता संचित शिंदे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या शासकीय निवासस्थानामध्ये वीज, पाणी, स्वच्छता व्यवस्था, अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत तसेच इतर आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे प्रशासनाच्या कामकाजात सुलभता येऊन वेळेवर निर्णय प्रक्रिया व सेवा पुरवठा अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.