गोरेगाव, ता.३१ : येथील नगरपंचायत समिती सभापतींची निवडणूक शुक्रवारी (ता.३०) नगरपंचायत सभागृहात निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड होत्या. यावेळी मुख्याधिकारी अक्षय परदेशी, नगराध्यक्ष तेजराम बिसेन, नगर उपाध्यक्ष मलेशाम येरोला, गटनेता आशीष बारेवार व नगरसेवक उपस्थित होते.
सर्वप्रथम बांधकाम समिती सभापतिपदाच्या निवडीसाठी काँग्रेसचे पवनकुमार रहांगडाले यांचे नाव समोर आले. त्यांच्या विरोधात दुसरे नाव पुढे आले नसल्याने पवनकुमार रहांगडाले हे बिनविरोध निवडून आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली.तसेच पाणीपुरवठा समिती सभापती म्हणून काँग्रेसच्या रंजना बारेवार यांची, तर महिला बालकल्याण समिती सभापतिपदी तिमेश्वरी पटले यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्ष मलेशाम येरोला यांच्याकडे आरोग्य व स्वच्छता विभाग देण्यात आला.





