गोंदिया : तालुक्यातील मोरवाही येथील अशोक चैतराम ब्राह्मणकर या शेतकऱ्याच्या दुकान व गुरांच्या गोठ्याला शुक्रवारी (ता-३०) दुपारी अचानक आग लागली. यात जवळपास तिन लक्ष रुपयांचे नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे.
रब्बी धान पिकाची लागवड सुरू असल्याने घरातील सर्व मंडळी शेतात गेली होती. अश्यात शुक्रवारी दुपारी अकरा वाजता च्या सुमारास गोठ्याला आग लागली. गावकऱ्यांनी तत्काळ मदत पोहचवित आगीवर नियंत्रण केले. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सदर शेतकऱ्याचे मनेरी दुकानाचे व गोठ्याचे असे मिळून जवळपास तिन लक्ष रुपयांचे नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे. आगीचे कारण मात्र कळू शकले नाही. घटनास्थळाला स्थानिक तलाठी तसेच ग्रामीण पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.





