28 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ पंचायत समिती गोंदियाने विशेष सभेत केली सिकलसेल जनजागृती

पंचायत समिती गोंदियाने विशेष सभेत केली सिकलसेल जनजागृती

0
42

गोंदिया (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाशजी आबिटकर यांच्या संकल्पनेतुन सिकलसेल आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी राज्यातील 21 जिल्ह्यामध्ये दि.15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी या कालावधीत अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान‘ राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी प्रजित नायर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथन यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले यांच्या प्रत्यक्ष कार्यवाहीत जिल्ह्यातील आरोग्य संस्थेमार्फत सिकलसेल आजाराबाबत तपासणी,निदान व उपचार,समुपदेशन व जनजागृती करण्यात येत आहे.

जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात आरोग्य विभागामार्फत अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानाच्या माध्यमातुन तपासणी,उपचार,समुपदेशन व जनजागृतीची नवी क्रांती सुरु आहे.दि.27 जानेवारी रोजी पंचायत समिती गोंदिया कार्यालयात एक महत्त्वपूर्ण विशेष बैठक संपन्न झाली. विशेष सभा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.तानाजी लोखंडे, पाणी पुरवठा व स्वच्छ्ता विभागाचे प्रकल्प संचालक विजय लोंढे, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरी,विस्तार अधिकारी निमजे,सांख्यिकी अन्वेषक विद्या वालकोळी व आरोग्य पर्यवेक्षक विजय शेडें यांचे उपस्थितीत संपन्न झाली. विशेष सभेत सिकलसेल आजाराबाबत उदात्त कार्याबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने सर्व उपस्थित मान्यवर अधिकाऱ्यांनी पोष्टरच्या माध्यमातुन जनजागृती केली.

दि.27 जानेवारी रोजी पंचायत समिती गोंदिया येथे गोंदिया जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.तानाजी लोखंडे यांनी यावेळी सिकलसेल हा पूर्णपणे बरा होणारा आजार नसला तरीयोग्य वेळी निदान आणि नियमित उपचार घेतल्यास रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतो.अरुणोदय‘ अभियानाच्या माध्यमातून कार्यक्षेत्रातील 0 ते 40 वर्ष वयोगटातील महिला व पुरुषांची रक्त तपासणी करणे आवश्यक आहे.रक्ताच्या नात्यात लग्न टाळणे आणि विवाहापूर्वी सिकलसेल कुंडली जुळवणे ही या आजाराला रोखण्याची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले.जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे सांख्यिकी अन्वेषक विद्या वालकोळी व आरोग्य पर्यवेक्षक विजय शेडें यांनी सीआरएस पोर्टल,जन्म व मृत्यु नोंदनी व अधिनियम बाबतीत माहीती दिली.पंचायत समितीच्या विशेष सभेत जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी, संगणक परिचालक यांचेसह पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

blank