पालकमंत्र्याच्या मतदारसंघात पं.उपाध्याय जयंती कार्यक्रमात विभागली भाजप

0
13

अर्जुनी मोरगाव,दि.28-‘एकात्म मानववादाचा’ प्रगतशील विचार जनमानसात रुजविणारे  थोर विचारवंत, कुशल संघटक आणि भारतीय जनसंघाचे ज्येष्ठ नेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जंयती यावेळी भाजपच्यावतीने देशभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.त्यासाठी पक्षाने भाजपच्या सर्व कार्यालयामध्ये कार्यक्रम घेण्याच्या सुचना दिल्या होत्या.त्यानुसार गोंदिया जिल्ह्यातही कार्यक्रम घेण्यात आले.यातच जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात मात्र जयंती कार्यक्रम साजरा करतांना भाजप दोन गटात विभागली गेल्याचे चित्र बघावयास मिळाले.

एकच कार्यक्रम वेगवेगळ्या  दिवसी झाल्याने अर्जुनी मोरगाव भाजपमध्ये उघड उघड दोन गट असल्याचे या निमित्ताने दिसून आले.सोबतच स्थानिक भाजपच्या नेत्यामध्ये समन्वय नसल्याचेही दिसून आले.समन्वय नसल्याने भाजपचे जुने निष्ठावान पदाधिकारी ,कार्यकर्ते यांच्यात दुरावा निर्माण होऊ लागल्याचे चित्र स्पष्ट झाले असून संघटन कौशल्याअभावी भाजपला भविष्यात मात्र त्रास जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

याचे असे की पालकमंत्र्याच्या जनसपंर्क कार्यालयात पंडीत दिनदयाल उपाध्याय यांची जयंती भाजपच्या वतीने सोमवारला साजरी करण्यात आली.त्यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष उमाकांत ढेंगे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.तर मंगळवारला परत श्री गणेश मंदिर (श्री विनायकजी जोशी )अर्जुनी मोर येथे पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जयंती उत्सव  भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी रघुनाथ लांजेवार यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.जंयती कार्यक्रमाला गिरिश  बागडे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी रुशि सहारे,अशोक चांडक,मुकेश जायसवाल,सौ .मंजुशा तरोने,सौ .ब्राम्हणकर ,शिवराम लोधीं,लूकेस  सूर्यवंशी ,बाळा पालीवाल ,लालित बाळबूढ़े ,लोकेश ऊख्रे ,बालू बड़वाईक आणी इतर कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन व आभार कांतीराम कापगते यांनी मानले.