22.9 C
Gondiā
Thursday, August 20, 2026
Home राजकीय काँग्रेसला धक्का देत रिटा बहुगुणांचा भाजपा प्रवेश

काँग्रेसला धक्का देत रिटा बहुगुणांचा भाजपा प्रवेश

0
24

नवी दिल्ली, दि. २० – उत्तरप्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रिटा बहुगुणा जोशी यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत त्यांनी हा भजपामध्ये प्रवेश केला आहे. रिटा बहुगुणा या उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा यांच्या कन्या आहेत. साल २००७-१२ च्या दरम्यान उत्तरप्रदेश काँग्रेस कमिटीच्या त्या अध्यक्ष राहिल्या आहेत.