४ जी सेवा द्या, अन्यथा आंदोलन

0
8

अर्जुनी मोरगाव,दि.21 : माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग असून देखील तालुक्यात अद्याप ४ जी सेवा सुरू झाली नाही. ही सेवा तत्काळ सुरू करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन भारत संचार निगम लिमिटेडचे उपविभागीय अभियंता यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, अर्जुनी मोरगाव तालुका गोंदिया जिल्ह्यात महत्वाचा तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्याला गेल्या वर्षभरापूर्वी राज्याच्या मंत्रीमंडळात मंत्रीपद देखील मिळाले. तालुक्यात ३ जी इंटरनेटची सेवा सुरू झाली. मात्र ४जी इंटरनेटसेवा अद्याप सुरू झाली नाही. त्यामुळे इंटरनेट धिम्या गतीने चालत आहे. त्याचा फटका विविध शासकीय, खासगी कार्यालयांसह मोबाईल धारकांना बसत आहे. या समस्येकडे लक्ष देवून तत्काळ ४जी इंटरनेटसेवा तत्काळ सुरू करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन सुरू करण्यात येईल, शिष्टमंडळात व्यंकट खोब्रागडे, ललित बाळबुद्धे, सुरेंद्रकुमार ठवरे, बालू बडवाईक, गिरीश बागडे, अविनाश कापगते, राधेशाम भेंडारकर, ओमप्रकाशसिंहपवार, प्रमोद पाऊलझगडे, राधेशाम झोळे, विलास ब्राम्हणकर उपस्थित होते.