26.6 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ भंडारा जिल्हयात महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद

भंडारा जिल्हयात महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद

0
40

भंडारा,दि.07: जिल्हयातील सातही तालुकयात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 मध्ये आयोजित शिबीरांना नागरिकांनी मोठया प्रमाणावर प्रतिसाद दिला.

भंडारा तालुक्यातील शहापूर येथील डिफेन्स ॲकेडमीच्या परिसरात आयोजित  आज समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला आज आमदार नरेंद्र भोंडेकर,जिल्हा परिषद सदस्य आशाताई डोरले,प्रेम वनवे,पंचायत समिती सभापती कल्पनाताई कुर्झेकर ,जिल्हाधिकारी सावनकुमार,जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ,उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे,तहसीलदार श्री.माकोडे ,सरपंच शहापूर मंगला देवगडे,सरपंच गोपीवाडा विनायक टांगले, सरपंच ठाणा पुरूषोत्तम कांबळे,सरपंच नांदोरा रेखाताई खोब्रागडे,सरपंच खराडी संजय हिवसे,उपस्थित होते.नागरिकांच्या शासकीय कार्यालयातील प्रलंबित बाबी,समस्या,तक्रारी निवारणासाठी हे शिबीर महत्वाचे असल्याचे आमदार श्री.भोंडेकर म्हणाले.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मंडळ स्तरावर 7 मार्च ते  15मे या कालावधीत एकदिवसीय समाधान शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे. महसूल विभागांतर्गत दैनंदिन प्रश्न सत्वर निकाली काढणे, जमीन महसूल संहितेच्या २०२५च्या सुधारणांची प्रभावी अंमलबजावणी, डिजिटल सातबारा सेवांचा जास्तीत जास्त वापर ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

जिल्ह्यांतील मंडळ व नगरपरिषद /पंचायत स्तरावर शिबिरे होणार आहेत. यात ७ मार्चला शहापूर, सावरला, देव्हाडी, पालोरा, सानगडी, पालांदूर, भागडी. १४ मार्चला धारगाव, आमगाव, मिटेगाव, वरठी, एकोडी, मुरमाडी / तूप, बारव्हा. २४ मार्चला पहेला, चिचाळ, करडी, साकोली, मासळ, येथे होणार  आहे.

शिबिरापूर्वी उपविभागीय समितीने प्रलंबित याद्या तयार, अर्ज भरून मंजुरी, शाळा अभ्यासक्रम, ग्रामपंचायतींसाठी आदेश वितरण पूर्ण करावे. तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी एकाच ठिकाणी उपलब्ध राहून एक खिडकीतून अर्ज स्वीकृती, प्रक्रिया व निकाल देणार, महाभूमी पोर्टलवर डिजिटल ७/१२ डाउनलोडचे प्रात्यक्षिक करतील. तलाठी, मंडळ कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज व कागदपत्रे तयार करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी केले.

खमारी, आसगाव, मर्रा, कांद्री, सानगडी, पिंपळाव, विरली / बु १७ एप्रिलला बेला, कोंढा, सिहोरा, कान्हळगाव, एकोडी, पोहरा, बारव्हा. ८ मे रोजी भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी, साकोली, लाखनी. १५ मे रोजी खोकरला, आड्याळ, नाकाडोंगरी, आंधळगाव, साकोली, लाखांदूरचा समावेश आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मंडळ स्तरावर 7 मार्च ते  15मे या कालावधीत एकदिवसीय समाधान शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे. महसूल विभागांतर्गत दैनंदिन प्रश्न सत्वर निकाली काढणे, जमीन महसूल संहितेच्या २०२५च्या सुधारणांची प्रभावी अंमलबजावणी, डिजिटल सातबारा सेवांचा जास्तीत जास्त वापर ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

जिल्ह्यांतील मंडळ व नगरपरिषद /पंचायत स्तरावर शिबिरे होणार आहेत. यात ७ मार्चला शहापूर, सावरला, देव्हाडी, पालोरा, सानगडी, पालांदूर, भागडी. १४ मार्चला धारगाव, आमगाव, मिटेगाव, वरठी, एकोडी, मुरमाडी / तूप, बारव्हा. २४ मार्चला पहेला, चिचाळ, करडी, साकोली, मासळ, व  १० एप्रिलला पूर्वतयारी व एक खिडकी योजना खमारी, आसगाव, मर्रा, कांद्री, सानगडी, पिंपळाव, विरली / बु १७ एप्रिलला बेला, कोंढा, सिहोरा, कान्हळगाव, एकोडी, पोहरा, बारव्हा. ८ मे रोजी भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी, साकोली, लाखनी. १५ मे रोजी खोकरला, आड्याळ, नाकाडोंगरी, आंधळगाव, साकोली, लाखांदूरचा समावेश आहे.

blank