23.2 C
Gondiā
Thursday, August 20, 2026
Home विदर्भ रामभाऊ अस्वले यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

रामभाऊ अस्वले यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

0
16

मुंबई, दि. 24 – भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार रामभाऊ अस्वले यांच्या
निधनाने सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने काम
करणारे व्यक्तीमत्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, रामभाऊंच्या निधनाने
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक सच्चा स्वयंसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे
निष्ठावंत व्यक्तिमत्त्व हरपले आहे. रामभाऊ हे वक्तशीरपणा आणि
काटेकोरपणासाठी ओळखले जायचे. आपल्या विधानसभा मतदारसंघात अतिशय समर्पण
भावनेने त्यांनी काम केले. आपल्या विधानसभा क्षेत्राचा दौरा त्यांनी
निश्चित केला की, ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी ते उपस्थित असायचे.
अतिशय शिस्तप्रिय असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. सलग तीनवेळा ते
विधानसभेचे सदस्य होते आणि त्यांच्यारूपाने भंडारा शहर मतदारसंघात
भाजपाला प्रथमच प्रतिनिधित्त्व मिळाले होते. ग्रंथालयाच्या चळवळीत सुद्धा
त्यांनी अतिशय चांगले काम केले. भंडाऱ्यातील सार्वजनिक जीवन अधिक समृद्ध
करण्यात त्यांचा वाटा मोठा होता