क्रिमिलेअरची अट रद्द करा : ओबीसी सेवा संघाचे प. महाराष्ट्र अधिवेशन

0
11

पुणे दि. २४ :: क्रिमिलेअरची अट घालण्यात आल्याने ५0 टक्के ओबीसींना सवलती मिळत नाहीत, त्यामुळे ही अट रद्द केली जावी, अशी मागणी रविवारी ओबीसी सेवासंघाच्या पश्‍चिम महाराष्ट्र अधिवेशनात स्वागताध्यक्ष विठ्ठलराव सातव यांनी केली.
जागे होण्याची वेळ येऊनही ओबीसी समाज झोपलेला आहे. त्याला जाग आणण्याचे काम झाले पाहिजे, अशी अपेक्षा ओबीसी सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप ढोबळे यांनी केले.
सध्याचा काळ ओबीसींना अडचणीचा आहे, मात्र ते एकत्र येत आहेत, ही समाधानाची बाब असल्याचे सांगून भगवानराव बिडवे म्हणाले, बलुतेदारांनी ओबीसी ही एकच जात मानून संघटीत व्हावे.केवळ जातीच्या आधारावर जे संघटीत होतात, ती आंदोलने संपल्याशिवाय राहत नाहीत, असे सांगून प्रतिमा परदेशी म्हणाल्या, जातीअंताच्या लढय़ासाठी सर्व जातींना एकत्र आले पाहीजे.
कार्यक्रमाच्या दुसर्‍या सत्रात गौरव उबाळे यांना ओबीसी भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. तर, सुमनताई पवार, प्रल्हाद वडगावकर, संजय राजे यांनाही ओबीसी जाणीव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.