24.2 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home विदर्भ ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ अंतर्गत समाधान शिबिर

‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ अंतर्गत समाधान शिबिर

0
45

तिरोडा : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ अंतर्गत येथे समाधान शिबिर उत्साहात व यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात नागरिकांनी महसूल विभागाशी संबंधित विविध समस्यांचे तातडीने निराकरण करून घेतले. यामध्ये ७-१२ व ८-अ मधील नाव नोंदणी व हिस्से वाटप, उत्पन्न, जात, रहिवासी व नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना नोंदणी, संजय गांधी निराधार योजना, फेरफार प्रकरणे, डिजिटल सातबारा, बिनशेती (एनए) संदर्भात मार्गदर्शन तसेच नवजात बाळांसाठी बाळ संगोपन किट वितरण अशा विविध शासकीय योजनांचा लाभनागरिकांना देण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे अभियान छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान यांच्या न्यायपूर्ण व जनकल्याणकारी शासन व्यवस्थेच्या आदर्शाला साजेसे असून प्रशासन जनतेच्या दारी सेवा पोहोचविण्याचे उत्तम उदाहरण असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
याप्रसंगी तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील विकास, शेतकऱ्यांचे हक्क आणि प्रत्येक नागरिकाला शासनाच्या योजनांचा लाभमिळवून देण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे आमदार विजय रहांगडाले यांनी सांगितले.या कार्यक्रमाला प्रामुख्याने जि. प. सदस्य जगदीश बावनथडे, बाजार समिती सभापती जितेंद्र रहांगडाले, जि. प. माजी उपाध्यक्ष मदन पटले, उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार नारायण ठाकरे, गटविकास अधिकारी सिंगनजुडे, बालविकास अधिकारी विनोद चौधरी तसेच सरपंच, सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

blank