24.7 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home विदर्भ पूज्य सिंधी जनरल पंचायततर्फे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांचा भव्य सत्कार

पूज्य सिंधी जनरल पंचायततर्फे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांचा भव्य सत्कार

0
35

गोंदिया : भगवान झूलेलाल यांच्या पावन जयंती चेट्रीचंड्र निमित्त गोंदिया आगमन झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांचा पूज्य सिंधी जनरल पंचायततर्फे भव्य सत्कार करण्यात आला.
अलिकडेच महाराष्ट्र सरकारतर्फे सिंधी समाजातील नजूल धारकांना मालकी हक्क प्रदान करण्यासाठी ऐतिहासिक कायदा करण्यात आला असून, या निर्णायक पावलाबद्दल समाजतर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आला. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे आणि विधायक विनोद अग्रवाल यांच्या अथक प्रयत्नांमुळे शक्य झाला आहे.
कार्यक्रमात पात्र नागरिकांना पट्ट्यांचे वितरण करण्यात आले. उर्वरित लाभार्थ्यांना आगामी दिवसांत पट्टे देण्यात येतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या प्रसंगी प्रमुखपणे विधायक विनोद अग्रवाल, विधायक  विजय राहंगडाले,जिल्हा अध्यक्ष  सीताताई राहंगडाले,जिल्हाधिकारी प्रजीत नायर, RDC भैयालाल बेहेरे, उपजिल्हाधिकारी मानसी पाटील आणि उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत उपस्थित होते.
पूज्य सिंधी जनरल पंचायतचे अध्यक्ष दरयानोमल आसवानी, राजकुमार नौतानी,महेश आहूजा,कमल वाधवानी आणि विनोद (गुड्डू) चांदवानी यांनी मान्यवरांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि समाजतर्फे आभार व्यक्त केले.