25.1 C
Gondiā
Friday, August 21, 2026
Home विदर्भ विदर्भ हिंद केसरी बैलगाडा शर्यतीचा समारोप उत्साहात

विदर्भ हिंद केसरी बैलगाडा शर्यतीचा समारोप उत्साहात

0
415

**माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न

गोंदिया — तालुक्यातील दांडेगाव, एकोडी व सहेसपुर व परिसराच्या वतीने आयोजित २० ते २२ मार्च दरम्यान तीन दिवसीय विदर्भ हिंद केसरी बैलगाडा शर्यत भव्य बैलांचा इनामी शंकर पटाच्या बक्षीस वितरण समारोह अध्यक्षस्थानी माजी आमदार राजेंद्र जैन व प्रमुख पाहुणे आमदार विजय रहांगडाले व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

बक्षीस वितरण कार्यक्रमाला माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांनी वर्षानुवर्षे जोपासलेल्या परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले तसेच अशा स्पर्धांमुळे गावांमधील एकात्मता व सांस्कृतिक परंपरा टिकून राहण्यास मदत होते, असे मत व्यक्त केले.

या स्पर्धेच्या विजेत्यांना व प्रोत्साहनात्मक पुरस्कारामध्ये प्रथम बक्षीस हिरोहोंडा बाईक व अन्य एकूण १० लाखापर्यंतचे बक्षिक या स्पर्धेतील विजेत्यांना व प्रोत्साहनपर देण्यात आले.

या प्रसंगी सर्वश्री राजेंद्र जैन, विजय रहांगडाले, पिंटू रहांगडाले, राजू एन जैन, रवीकुमार पटले, सुरेश पटले, अजबराव रिनाईत, गोविंद लिचडे, पंकज अंबुले, हितेश पातेह, महेंद्र बघेले सह मोठ्या संख्येने बक्षीस वितरण समारंभात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. समारोह प्रसंगी आयोजकांनी सर्व सहभागी व उपस्थितांचे आभार मानले.