
गोंदिया : एफिस्टीन फाईलमध्ये पंतप्रधान मोदी यांच्यासह काही मंत्र्याची नावे समोर आली आहेत. यामुळे देशाची प्रतिमा मलिन झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घ्यावे, या मागणीला घेवून वंचित बहुजन आघाडीसह सर्व डाव्या पक्षाच्या नागपूर येथील संघ मुख्यालयावर २३ मार्च रोजी मोर्चा व निदर्शने करण्यात येणार आहेत. या मोर्चात गोंदिया जिल्ह्यातून ४ ते ५ हजार पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार, असल्याची माहिती आयोजित पत्र परिषदेत देण्यात आली आहे.
‘मुद्रा मोदी ते मुजरा मोदी’ या नाऱ्याला घेवून वंचित बहुजन आघाडीने भाजप सरकारविरुध्द एल्गार पुकारला आहे. येत्या २३ मार्च रोजी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर मोर्चा व निदर्शने करण्यात येणार आहेत. या अनुषंगाने पत्र परिषदेत आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित पदाधिकारी म्हणाजे, एफस्टिन फाईल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काही मंत्र्यांची नावे आहेत. या प्रकाराने देशाची प्रतिमा मलिन झाली आहे. जेफरी एफस्टिन कुकर्त्याशी पंतप्रधान मोदी यांचे संबध असावे, हे देशासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे प्रधानमंत्री मोदी यांनी राजीनामा द्यावा तसेच भाजपला मार्गदर्शन करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेवून पंतप्रधान मोदी यांना राजीनामा देण्यास बाध्य करावे, या प्रमुख मागणीला घेवून मोर्चा व निदर्शने करण्यात येणार आहे. या मोर्ध्यात राज्यभरातून पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. मोर्चाला काँग्रेससह इतर डाव्या पक्षांचाही पाठिंबा आहे. आयोजित पत्रपरिषदेत राजु राहुलकर, विनोद मेश्राम, नरेंद्र बोरकर, सतिश बन्सोड, एन. यु. शामकुंवर तसेच आदि पदाधिकारी उपस्थित होते.




