गोंदिया : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३५ व्या जयंतीसाठी गोंदियात जय्यत तय्यारी सुरु झाली आहे. पुढील महिन्यात हा कार्यक्रम ११ एप्रिल पासून सुरु होणार असून १५ एप्रिल रोजी समारोप होणार आहे. या पाच दिवशीय कार्यक्रमादरम्यान विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. दरम्यान १४ एप्रिल रोजी आयोजित मुख्य कार्यक्रमात दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयाचे ? ड सत्यप्रकाश गौतम आणि मध्यप्रदेशचे महेंद्रसिंग लोधी मुख्यवक्ता म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. तर १५ एप्रिल रोजी आयोजित कॅडर कॅम्प मध्ये उत्तरप्रदेशचे फुले, शाहू, आंबेडकरी ज्येष्ठ
विचारवंत राजकुमार भाटी मार्गदर्शन करणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्व. जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अरविंद भावे यांनी दिलेल्या माहिती नुसार जयंतीच्या कार्यक्रमासाठी कार्यकर्ते कामाला लागले असून हा कार्यक्रम नगरपरिषद सुभाष शाळेच्या पटांगनावर होणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त ११ एप्रिल रोजी सकाळी भीमनगर येथून रॅली काढण्यात येणार असून समारोप मरारटोली येथे होणार आहे. १२ एप्रिल रोजी जिल्ह्यातील विविध शाळेतून विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार असून वरिष्ठ अधिकारी हे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बद्दल मार्गदर्शन करणार आहेत. १३ एप्रिलच्या मध्यरात्री फटाक्याच्या लड्या फोडून अतिशबाजी करण्यात येईल. त्यांनतर १४ एप्रिल रोजी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून जयंतीच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. शहरातील प्रत्येक भागातून रॅली काढण्यात येणार असून फुले शाहू आंबेडकरी विचारधारेवर देखाव्यांचे प्रदर्शन घडविण्यात येणार आहे. याप्रसंगी विविध समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांचा स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात येईल.
सत्यप्रकाश आणि इंजि. महेंद्रसिंग लोधी मार्गदर्शन करणार आहेत. १५ एप्रिल रोजी उत्तर प्रदेशचे फुले शाहू आंबेडकरी विचारवंत राजकुमार भाटी प्रबोधन करणार आहेत. मुंबईचा जय ऑर्केस्ट्रा यांची मनोरंजन पर संगित मैफल, भीम बुद्ध गीतांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. दरम्यान या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जयंती समितीचे अध्यक्ष अरविंद भावे, उपाध्यक्ष दिनेश उके, अॅड.कार्याध्यक्ष प्रा. रितेश चौरावार, प्रा. डॉ. अश्विन खांडेकर, संयोजक राजश्री पुंजेकर, कोषाध्यक्ष किशोर रामटेके, सचिव अंकुर गजभिये, विलास वासनिक, पंकज वासनिक, इंजिनिअर छोटू बोरकर, संजय वाहने, मच्छिंद्र भेलावे, मनीषा गजभिये, कोकिळा राहुलकर, वंदना श्यामकुवर, समता गणवीर, सविता उके, डॉ. राजेश उके, सुनील पाटील, नूरलाल ऊके, सुशील गणवीर, संतोष शामकुमार, सुनील डोंगरे, अनंत टेंभुरकर, अशोक कांबळे, एन. एल. मेश्राम, नरेंद्र मेश्राम स्टडी पॉईंट, एड. एकता गणवीर, सुनील मेश्राम, अॅड. अंजली (चव्हाण), धनंजय मेश्राम, नरेश उके, प्रा. सुरेश नंदेश्वर, सुनील मेश्राम, पृथ्वीराज कोल्हटकर यांनी केले आहे.





