30.1 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ आयुष दवाखाना चुटिया येथे भव्य मोफत आयुष रोग निदान शिबिर

आयुष दवाखाना चुटिया येथे भव्य मोफत आयुष रोग निदान शिबिर

0
97

104 रुग्णांनी मोफत आयुष रोग निदान शिबीराचा लाभ घेतला

गोंदिया-राष्ट्रीय आयुष मिशन कार्यक्रम अंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार के.टी.एस. आयुष विभाग येथील चमुमार्फत जिल्ह्यात विविध ठिकाणी मोफत आयुष रोग निदान शिबिर आयोजित केली जात आहे.आयुष दवाखाना चुटिया येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.चुटिया येथील आरोग्य तपासणी शिबिराप्रसंगी माजी वित्त व बांधकाम सभापती संजुभाऊ टेंभरे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस भानपुर येथील प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.येडे यांनी प्रास्ताविक केले.त्यानंतर जिल्हा आयुष अधिकारी डॉ.मिना वट्टी यांनी आयुर्वेदिक चिकित्सेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात संजुभाऊ टेंभरे यांनी आजच्या काळातील बदलती जीवनशैलीसकस आहाराचे महत्त्व तसेच शेतीमध्ये होणाऱ्या खतांच्या अतिवापरामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले.

या शिबिरामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शिबिरात वात विकार,सांधेदुखी तसेच विविध आजारांची तपासणी करण्यात आली.तसेच योग मार्गदर्शनस्वर्णबिंदू प्राशनकुपिंग थेरपीअग्निकर्म व नस्य यांसारख्या आयुर्वेदिक उपचारांची माहिती व सेवा देण्यात आली. शिबिरामध्ये रोगांनुसार योग, हर्बल गार्डन मधील वनस्पतीचा उपयोग,नस्य,मसाज,पंचकर्म,दिनचर्या,ऋतुचर्या आयुर्वेदिक जीवन शैली बाबत माहिती देण्यात आली.104 रुग्णांनी मोफत आयुष रोग निदान शिबीराचा लाभ घेतला असल्याची माहीती जिल्हा आयुष अधिकारी डॉ.मीना वट्टी यांनी दिली आहे.

शिबिरामध्ये विशेष तज्ञ डॉ.मिना वट्टी,डॉ.महेंद्र संग्रामे,डॉ.येडे,डॉ.गुंजा,डॉ.वालके,डॉ.अंबुले यांचे द्वारे विविध आजारावर आयुर्वेदिक उपचाराचा शेकडो रुग्णांनी लाभ घेतला.तसेच या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यक्षेत्रातील आरोग्य सेविका,आरोग्य सेवक,आशा सेविका यांनी विशेष परिश्रम घेऊन रुग्णांची प्राथमिक नोंदणी,तपासणी व मार्गदर्शन केले.या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांना मोठा लाभ झाला असून शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.