30.6 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ सहाय्यक संचालक डॉ.नयना दुफारे यांनी केली “टास” ची पाहणी

सहाय्यक संचालक डॉ.नयना दुफारे यांनी केली “टास” ची पाहणी

0
44

गोंदिया-राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग समुदाय संक्रमण सर्वेक्षण मोहीम (टास) जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये गोंदिया,तिरोडा,अर्जुनी/मोरगाव व गोरेगाव येथे राबविण्यात येत आहे.दि.13 ते 21 एप्रिल दरम्यान टास तपासणी मोहीम चारही तालुक्यात सुरु आहे.हत्तीरोग समुदाय संक्रमण सर्वेक्षण (टास) मोहीमे दरम्यान  सँपल सर्वेतुन सहा ते सात वर्षे मुले व मुंलीची रक्त तपासणी करण्यात येऊन हत्तीरोग जंतूंचा प्रभार किती प्रमाणात आहे याबाबतचे विश्लेषण आकडेवारी संकलीत होणार असल्याची माहिती डॉ.विनोद चव्हाण यांनी या प्रसंगी दिली आहे.सदर टास सर्वेक्षण मुल्याकंन आकडेवारी वरून सामुदायिक औषध उपचार मोहीम राबविण्यात येणार किंवा नाही याबाबतची माहिती मिळण्यास सुलभ होणार आहे.

दिनांक 16 एप्रिल रोजी हत्तीरोग संक्रमण पडताळणी मोहिमेचे पर्यवेक्षण विभागीय चमूकडून करण्यात आले.यावेळी नागपुर विभागाचे सहाय्यक संचालक(हिवताप) डॉ.नयना दुफारे यांचे सह जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण,किटकशास्त्रज्ञ सचिन लकारे व निरंजन चिकटे,आरोग्य निरीक्षक किशोर भालेराव व ठाकूर तसेच तालुका आरोग्य सहाय्यक लिलाधर निपाने उपस्थित होते. सदर भेटी दरम्यान तिरोडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वडेगाव अंतर्गत बिर्शी व वडेगाव तसेच तिरोडा शहर येथील किल्ला वॉर्ड येथे भेट देऊन टास मोहिमेची पडताळणी करण्यात आली.त्याचबरोबर तिरोडा तालुका नियत्रंण पथक कार्यालय,उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथील फायलेरिया रात्रचिकित्सालय केंद्र व ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट येथील प्रयोगशाळेत सुद्धा भेट देऊन येथील कामाची तपासणी करण्यात आली.

टास सर्वेक्षणामध्ये जिल्हास्तरावरुन आरोग्य प्रशासनामार्फत 28 पथक निर्माण करण्यात आले असुन त्यात प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका, सामुदायिक आरोग्य अधिकारी,आशा सेविका यांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे.मोहिमे दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांचे सह आरोग्य पर्यवेक्षक यांचे द्वारे पर्यवेक्षण करण्यात येत आहे.

लिम्फॅटिक फिलेरियासिस (हत्तीरोग) निर्मूलनासाठी ट्रान्समिशन असेसमेंट सर्व्हे (टास) ही जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेली एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे.हत्तीरोग नियंत्रणासाठी ही मोहीम राबवली जात आहे.गोंदिया जिल्ह्यात वर्ष 2005 पासून एक दिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहिम राबविण्यात येत आहे.या मोहिमेचे यशाचे मूल्यमापन करण्यासाठी टास सर्वेक्षण केले जात आहे.औषधोपचार मोहीम चालू ठेवणे किंवा बंद करण्याचे निर्णय टासवर अवलंबून आहे. -डॉ.नयना दुफारे, सहाय्यक संचालक(हिवताप) विभाग नागपुर

दि.13 एप्रिल ते 21 एप्रिल दरम्यान गोंदिया,तिरोडा,अर्जुनी/मोरगाव व गोरेगाव ह्या चारही तालुक्यांतील 221 गावांमध्ये हत्तीरोग समुदाय संक्रमण सर्वेक्षण मोहीम (टास) राबवण्यात येत असून सँपल सर्वेतुन जवळपास 4107 सहा ते सात वर्षे मुले व मुंलीची रक्त तपासणी करण्यात येऊन हत्तीरोग जंतूंचा प्रभार किती प्रमाणात आहे याबाबतचे विश्लेषण आकडेवारी संकलीत होणार आहे.सदर टास सर्वेक्षण मुल्याकंन आकडेवारी वरून सामुदायिक औषध उपचार मोहीम राबविण्यात येणार किंवा नाही याबाबतची माहिती मिळण्यास सुलभ होणार आहे. डॉ.विनोद चव्हाण, जिल्हा हिवताप अधिकारी