29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचा भव्य सत्कार व गुणगौरव सोहळा

गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचा भव्य सत्कार व गुणगौरव सोहळा

0
145

गोंदिया,दि.22 एप्रिल :गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित, गोंदिया (र. नं. ०१) यांच्या वतीने सेवानिवृत्त सभासद शिक्षकांचा सत्कार तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सडक अर्जुनी तालुक्यात मोठ्या उत्साहात पार पडला. आशीर्वाद लॉन, शेंडा रोड, सडक अर्जुनी येथे आयोजित या कार्यक्रमास जिल्ह्य़ातील सेवानिवृत्त शिक्षक, त्यांचे कुटुंबीय, गुणवंत विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकऱाम भेंडारकर होते. प्रमुख उपस्थितीत सुरेश हर्षे उपाध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया,पद्मश्री डॉ परशुराम खुणे, आयएएस डॉ पंकज पटले, पंचायत समिती सभापती चेतन वडगाये, मध्यवर्ती बँकेचे संचालक गंगाधर परशुरामकर, जिल्हा परिषद सदस्य भुमेश्वर पटले , चंद्रकला डोंगरवार, उपसभापती निशा काशीवार , पंचायत समिती सदस्य शिवाजी गहाणे, अल्लाउद्दीन राजानी , डॉ रुकीराम वाढई , सपना नाईक ,वर्षा शहारे मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यामध्ये शिक्षण, प्रशासन व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती उल्लेखनीय होती.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वागतपर गीताने झाली.यावेळी संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना, शिक्षकांनी केलेल्या सेवाभावाचे कौतुक व संस्थेच्या वाढीकरिता सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार आपल्या प्रस्तावनेत अध्यक्ष किशोर डोंगरवार यांनी व्यक्त केले.
सेवानिवृत्त शिक्षकांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.आपल्या मनोगतात मान्यवरांनी शिक्षकांचे समाजातील योगदान अधोरेखित करताना, डॉ पंकज पटले IAS यांनी “शिक्षक हा समाजाचा कणा असून त्यांच्यामुळेच देशाची भावी पिढी घडते,” असे मत व्यक्त केले व आपल्या यशाचे श्रेय शिक्षक व पालकांना देत कृतज्ञता व्यक्त केली.या कार्यक्रमाला गोंदिया जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त शिक्षक सभासद बांधव सपत्नीक उपस्थित राहून आपला सन्मान स्वीकारला. तसेच गुणवंत विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. उपस्थितांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.कार्यक्रमाचे संचालन संचालक संदीप तिडके व उमेश रहांगडाले यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष किशोर बा. डोंगरवार,उपाध्यक्ष अशोक धों. बिसेन ,शाखाध्यक्ष गौतम बाँते,विनोद बडोले,शोभेलाल ठाकूर,तसेच संचालक दिलीप लोदी,राजेंद्र बोपचे,सतीश दमाहे,सौ भारती तिडके,कु नीतू दहाट,व्यवस्थापक ज्योतिप्रकाश गजभिये यासह सर्व कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.हा सोहळा शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करणारा आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा ठरला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.