25.1 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home विदर्भ ग्रामपंचायत अधिकारी पृथ्वीराज कोल्हटकर यांना प्रशस्तीपत्र

ग्रामपंचायत अधिकारी पृथ्वीराज कोल्हटकर यांना प्रशस्तीपत्र

0
134

गोंदिया ता.२ मे :- जिल्हा परिषदेत कार्यरत ग्रामपंचायत अधिकारी पृथ्वीराज कोल्हटकर यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर,मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम एम., उपाध्यक्ष सुरेश हर्ष यांच्या हस्ते हे प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे.
श्री कोल्हटकर यांनी शासकीय कामात दाखवलेल्या नैपुण्याबद्दल व शासकीय कामात गतिमानता आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल हे प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे.श्री कोल्हटकर यांनी आपल्या यशाचे श्रेय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मुरूगानंथम एम., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ तानाजी लोखंडे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एम. वासनिक, एफ. आर.कुतिरकर आणि अर्जुनी /मोर च्या गटविकास अधिकारी श्रीमती पल्लवी वाडेकर यांना दिले आहे.
त्यांच्या यशाबद्दल जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे सहाय्यक गट विकास अधिकारी एस. आय. वैद्य,गुणवंत ठाकूर,ज्ञानेश्वर कानडे, श्यामराव समरीत, प्रकाश तिरेले, रोहित बनसोड, प्रकाश रहांगडाले, सुनील चव्हाण, दिलीप चौधरी,सुनील साखरे,यांनी अभिनंदन केले आहे.

blank