सेवानिवृत्त सैनिकाचा स्वगावी सत्कार; गावातून काढली थाटात मिरवणूक
नितीन लिल्हारे
सालई खुर्द : देशरक्षणार्थ विविध ठिकाणी कर्तव्य बजावल्यानंतर सैन्य दलातील सेवानिवृत्त झालेल्या मोहाडी तालुक्यातील मांडेसर येथील सैनिकाचे गावकºयांनी अनोख्या पद्धतीने जल्लोषात स्वागत केले. शुक्रवार दि. २ मे २०२६ रोजी हा स्वागत समारोह झाला असून ढोल ताशे व बॅन्ड पथकाच्या गजरात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
गावचे सुपुत्र देशाचे रक्षण करतात याचा अभिमान असल्याने त्यांचा आदर्श गावातील नव्या उमेदीच्या तरुण पिढीने घ्यावा, या हेतूने निवृत्त सैनिकांची मिरवणूक काढून त्यांचा सन्मान करण्याचे ग्रामस्थांनी ठरविले होते.
मांडेसर येथील शैलेश अनिकलाल बसिने हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. १८ वर्ष सैन्य दलात देशसेवा करीत दि. ३० एप्रिल रोजी ते मराठा बटालियन बेलगाव कर्नाटक येथे सेवानिवृत्त संभारभ कार्यक्रम पार पडले. दि. २ मे रोजी ते आपल्या मूळ गावी मांडेसर येथे येणार असल्याने गावकºयांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. भंडारा रेल्वे
स्टेशनवर आगमन होताच बसिने कुटुंब, मित्र मंडळ व गावातील नागरिकांनी त्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पहाराने स्वागत केले. भंडारा रेल्वे स्टेशन वरून मांडेसर गावात दाखल होताच गावकऱ्यांनी जंगी स्वागत करून डीजे, ढोल, ताशे व बँड पथकाच्या गजरात राष्ट्रभक्तीपर गीतांच्या
निनादात त्यांच्या राहत्या घरापर्यंत वाजत, गाजत मिरवणुक काढण्यात आली. घरासमोर रांगोळी काढुन औक्षण करीत स्वागत केले. याच कार्यक्रमादरम्यान बसिने परिवार, मांडेसरच्या वतीने, पदाधिकारी व परिसरातील लोकांनी शाल, श्रीफळ व पुष्पहार देवुन सत्कार करण्यात आला. गावकºयांच्यावतीने झालेला अनोखा सत्कार पाहून सैनिक शैलेश बसिने भारावून गेले. यावेळी सत्काराला उत्तर देतांना ते म्हणाले की, सेवानिवृत्ती नंतरचे माझे जीवन गावातील तरुणांना देशसेवा, राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी व एकोपा निर्माण करण्यासाठी कार्य करीन, असे सांगितले. कार्यक्रमाला गाव व परिसरातील बहूसंख्य नागरीक, महिला, विद्यार्थी, माजी सैनिक, अधिकारी, पदाधिकारी, आजी सैनिक असा प्रचंड जनसमुदाय उपस्थित होते.





