27.3 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ भारत बौद्धमय करण्याचा संकल्प घ्या -श्रीमती अमृता मिलन

भारत बौद्धमय करण्याचा संकल्प घ्या -श्रीमती अमृता मिलन

0
74

मांगनेवाले छोडो गुलामी -संगीत मैफल गाजली
बुद्ध जयंतीचा समारोप
गोंदिया ता.3:- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शिकवणूक अंगीकार करुण आम्ही अनुयायी बनलो असतो तर भारत बौद्धमय झाला असता असा ठाम विश्वास छत्तीसगडच्या सामाजिक कार्यकर्त्यां श्रीमती अमृता मिलन यांनी व्यक्त केला.
श्रीमती अमृता ह्या तथागत बुद्ध जयंतीच्या द्विदिवशीय कार्यक्रमाच्या (ता. 2) समारोपीय प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अरविंद भावे हे होते. मंचावर छत्तीसगडचे बहुजन हितचिंतक रमेश जटवार,नगरसेविका स्नेहा ( डॉली ) गडपायले, माजी अध्यक्ष अनंत टेम्भूरकर,राजश्री गोंडाने, उपस्थित होते. श्रीमती अमृता मिलन पुढे म्हणाल्या की, आपला देश सर्वोपरी आहे,असं असलं तरी धर्म आणि राजनीतीला इथे अधिक महत्व दिलं जातं आहे . भारतात लोकशाही नाही कारण लोकशाहीची व्याख्या कळली नाही.देशाच्या लोकांसाठी येथील सरकार निर्णय घेऊ शकत नाही तेव्हा आपला देश स्वतंत्र झाला आहे असं कसं म्हणता येईल असा उलट प्रश्न त्यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे मी तुम्हाला पुस्तकातून भेटेन परंतु,मनुवाद्यानी पाठयपुस्तकातून बुद्ध,फुले, शाहू,आंबेडकर हे अदृश्य केले आहेत यावर त्यांनी चिंता व्यक्त केली.
इराण देशाचे उदाहरण देऊन मिलन पुढे म्हणाल्या की, इराण देश खऱ्या अर्थाने नीतिमत्तेवर चालतो. येथे महिला वैज्ञानिक आहेत. तो बुध्दाचे तत्वज्ञान स्वीकारतो म्हणून पुढे गेला आहे.
याप्रसंगी बोलताना श्री जटवार म्हणाले की बुध्दाचे तत्वज्ञान म्हणजे विज्ञान होय, विज्ञान हे चित आणि चेतना निर्माण करतं. सम्राट अशोक मौर्य यांच्यात चित आणि चेतना निर्माण झाल्यामुळं त्यांनी कलिंग युद्धाचा त्याग केला. आपली मुलं संघमित्रा आणि महेंद्र यांना परदेशात पाठवलं. 84 हजार शिलालेख निर्माण केलं.डाकू अंगुलीमालाणे हिंसेचा त्याग करुण बुध्दाचा मार्ग स्वीकारला. ते पुढे म्हणाले की, तथागताने जगात दुःख आहे,त्याचे कारण असून त्याचे निवारण करण्याचा उपाय बुद्धाने सांगितला आहे. त्यामुळे बौद्धानी त्रिशरण, पंचशीला, अष्टांगिक मार्ग आणि पारमितेचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केलं.
यावेळी शिवानी बांगरे या चिमुकलीने दिलेल्या जोरदार भाषणामुळे श्रोते आश्चर्यचकित झाले.
दरम्यान औरंगाबादचे बहुजन मिशनरी गायक योगीराज आनंद यांच्या संगीतमय मैफलने चांगलीच वाहवाही लुटली.
मांगनेवाले छोडो गुलामी,बनजाओ देनेवाला – येह कहता हूं मै जयभिमवाला तसेच भीमाईचं लेक लयी न्यारं,राखली समाजाची अब्रू -हे चवदावं लेकरू या गीतांना प्रेक्षकांनी जोरदार दाद दिली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने या दोनदिवशीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं.
तथागत बुध्द आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना वंदन करुण कार्यक्रमांची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे संचालन कोषाध्यक्ष किशोर रामटेके, यांनी तर डॉ अश्विन खांडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.जयंती समितीचे कार्यकर्ते,सुशील गणवीर, मच्छिन्द्र भेलावे,नरेश उके,अंकुर गजभिये, विलास वासनिक, पंकज वासनिक, नगरसेवक सुनील भरणे,संजय वाहने, एन. के. शेंडे,संतोष शामकुमार,प्रा. सुरेश नंदेश्वर,संतोष डोंगरे,अशोक कांबळे, एन. एल. मेश्राम. एड. एकता गणवीर, सुनील मेश्राम, सविता उके, कोकिळा राहुलकर,पौर्णिमा रामटेके, मनीषा गजभिये, राजश्री गोंडाने,सुनील डोंगरे,श्री चौरावार,नरेंद्र मेश्राम स्टडी पॉईंट, सुनील मेश्राम, पृथ्वीराज कोल्हटकर यांनी सहकार्य केले.यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती समितीच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले

blank