सेवा सर्तीची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात
गोंदिया- ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्तीची अंमलबजावणी करण्यास अपयशी ठरलेले जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समितीचे बिडीओ यांच्या धोरणाच्या विरोधात व आपल्या न्याय मागण्या मंजूर करवून घेण्यासाठी 11 मे रोजी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा -निदर्शने करण्याचे निर्णय (2 मे ) आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या जिल्हाध्यक्ष चत्रूगण लांजेवार यांचे अध्यक्षते खाली व राज्य महासंघाचे कार्याध्यक्ष कॉ. मिलिंद गणवीर यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली संपन्न बैठकीत घेण्यात आला. याबाठकीत जिल्हा पदाधिकारी महेंद्र कटरे (कार्याध्यक्ष ), बुधराम बोपचे, महेंद्र भोयर ,विनोद शहारे , विष्णू हत्तीमारे , ईश्वरदास भंडारी , दीप्ती राणे,खुशाल बनकर,यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला मार्गदर्शन करतांना मिलिंद गणवीर यांनी राज्य कार्यकारिणी ने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. व राज्य शासनाच्या अधिकार क्षेत्रांतर्गत असलेल्या मागण्यांना घेवून तीन टप्प्यात होणाऱ्या आंदोलनाचा पहिला टप्पा 11मे रोजी राज्य भर जिल्हा परिषदावर आंदोलन होणार आहे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या शेवासर्ती म्हणजे वेळेवर 5 तारखेच्या आत वेतन व भत्ता अदा करने, नियमानुसार भविष्य निधी जमा करने, सेवा पुस्तिका अद्यावत करने, सवेतन अर्जित रजा रजा, राज्य शासनाची वेतन अनुदानची प्रलंबित थकबाकी अदा करने, पंचायत समिती स्तरावर 3 व जिल्हा परिषद स्तरावर दर वर्षी दोन तक्रार निवारण समितीच्या सभा घेणे, आदी सेवा शर्तीची अंमल बजावणी करवून घेण्याची व उल्लंघणं करणाऱ्या अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेचे उप मु.का. अधी.यांना राज्य शासनाचे ग्राम विकास विभागाने दिले असून ही व संघटनेच्या वतीने वारंवार दिलेल्या तक्रारी कडे हे अधिकारी सातत्याने दुर्लक्ष करत आहेत जर असे अकार्यक्षम अधिकारीच उल्लंघन करत असतील तर यांचे वर कार्यवाही कोण करणार? अशा प्रश्न उदभवलेला आहे म्हणून अश्या बेजबाबदार उप मु.कार्य. अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी जिल्हाधिकारी मु. कार्य. अधिकारी व विभागीय आयुक्त नागपूर यांचेकडे या आंदोलनाच्या माध्यमाने करण्यात येईल या सभेत देवेंद्र मेश्राम, माणिक शहारे, गजें हिरवानी, मनोज कोटांगले,गणेश कांबळी,निलेश मस्के, सुरज रामटेके ऋषीपल डोंगरे, देवेंद्र दुरुगकर, आशा शहारे, मोरेश्वर कोटांगले, राजेश भोकासे, अरुण बोपचे, सुरेश ठाकरे, राजकुमार मोटघरे, रामेश्वर उके, यादोराव तुमळाम, सह अनेक कार्यकर्ते हजर होते.





