देवरी,दि.०८- नागपूर माध्यमिक शालांत परीक्षेचा आज १०वी निकाल आला. यामध्ये देवरी तालुक्यातील मुल्ला या छोट्याशा गावातील आस्था मुकेश अग्रवाल या विद्यार्थिनीने ९६.८० टक्के गुण प्राप्त करून तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविला.
आज दहावी बोर्डाचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये मुल्ला येथील किराणा व्यापारी मुकेश छोटेलाल अग्रवाल यांची मुलगी आस्था हिने तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. आस्थाच्या या यशाने तिच्या कुटुंबीयासह संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे. तिच्या यशाने प्रभावीत होऊन अनेक विद्यार्थी तिच्या पावलावर पाऊल टाकत पुढे जाण्याचे स्वप्न बाळगून असल्याचे दिसून आले.
संपूर्ण देवरी तालुक्यातून आस्थावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आपले आई-बाबा, शिक्षक आणि सर्व मार्गदर्शक यांना दिले आहे. तिच्या यशाचे कौतूक करीत मुल्लाचे सरपंच कल्पना बागडे यांचेसह ग्राम विकास अधिकारी शहारे, पोलिसपाटील ललिता भुते, कृषि अधिकारी श्री. सलामे, महावितरणचे गुलाब शहारे, सुनील शिवणकर, सुरेंद्र मेंढे, मुख्याध्यापिका गभणे, शिक्षिका शीतल उके, सुशिला भेलावे, बेरारटाईम्सचे सहसंपादक सुरेश भदाडे, एलआयसीच्या अनिता भदाडे, कुणाल गौपाले, योगेश हेमणे, दीपक राहुलकर, ग्राम पंचायत सदस्य मुकेश राऊत, जगतराम कुरसुंगे, राजकुमार कुथीर,योगेश फुंडे, वनिता लाडे, राजकुमार खोटेले, दिनेश शिवणकर, राजकुमार भेंडारकर, अॅड महेश पोगडे, राजेश पटले, वीरेंद्र पोगडे, विजय खोटेले आदी मान्यवरांनी अभिनंदन करीत गावाचे नाव उंचाविल्याबद्दल तिचा गौरव केला. तिने मिळविलेल्या यशाने गावातील इतर ही विद्यार्थी प्रेरणा घेतील, अशा आशा सरपंच बागडे यांनी व्यक्त केली.





