भारतीय संस्कृतीत मानवीय मूल्ये

0
12

गोंदिया दि.०८: भारतीय संस्कृतीमुळेच मानविय मूल्यांची निर्मिती झाली आहे. मात्र सध्या पाश्‍चात्तीकरणामुळे जीवन आत्मकेंद्रीत होत चालले आहे. मानविय मूल्यांची आज गरज आहे, असे मार्गदर्शन साध्वी ऋतुंभरा यांनी केले.
श्रीमदभागवत कथाज्ञानयज्ञाच्या चौथ्या प्रवचनात त्या भाविकांना बोधामृत पाजत होत्या. यात कृष्ण जन्मोत्सवाचे आकर्षण असल्यामुळे श्रोते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
साध्वी ऋतुंभरा यांनी भगवान रामाच्या महिमेचे गुणगान केले. अहिल्या उद्धाराच्या प्रसंगाच्या माध्यमाने नारी शोषण व उपेक्षा यांची कठोर आलोचना केली. उत्सर्ग व त्यागाच्या अभावाला दुर्भाग्यजनक सांगितले. तसेच त्यांनी सात्विक व प्रेममय योजनाचे महत्व प्रतिपादित केले.
यानंतर साध्वींनी भारतीय नारीचे शौर्य, सेवा, सर्मपण, शील व सतीत्व यांचे वेिषण केले. त्यांनी जीवनातील अंधार-उजेड समजविताना संघर्षमय जीवनच सार्थक व मूल्यवान असल्याचे म्हटले. संघर्षशील कर्मयोगीच शिवतत्वाच्या सीमेत प्रवेश करते. कवी प्रदीप यांचा कालजयी गीत ‘तेरे द्वार खडा भगवान’चे गायन करून वामन अवतारचा प्रसंग सादर केला. राम अवतरण व रघुकूल शिरोमणी रामाचे स्नेहभाग कथन केले. कार्यकर्त्यांच्या प्रती स्नेहभावाचे वर्णन करीत शबरीला दिलेल्या सन्मानाची प्रसंशा केली. आज नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांप्रती या अंतरंगाचा अभाव असल्याचे त्या म्हणाल्या.
आज आसुरी वृत्ती हावी होत आहेत. त्यांचे उन्मुलनच धर्मयुद्ध आहे. यात असिधारा व्रताचे पालन करावे लागेल, असे साध्वींनी सांगितले.
यावेळी कृष्ण जन्माचा उत्सव कलात्मक झाकी व मोठय़ा उल्हाषाने साजरा करण्यात आला. श्रीखंड प्रसाद म्हणून हजारो श्रोत्यांना वाटप करण्यात आला. अमेरिकेवरून आलेले भारतीय संस्कृतीचे उपासक व पोषक आचार्य ब्रजमोहन अग्रवाल यांचे कौतुक करण्यात आले. माजी मंत्री व खा. प्रफुल्ल पटेल यांची उपस्थितीसुद्धा महत्वपूर्ण होती.