तिरोडा,दि.१२ः तालुक्यातील चुरडी येथे दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या एड.माधुरीताई रहागंडाले यांच्या हस्ते करण्यात आले.सदर कामावर १० लाख रुपयाचा निधी खर्च करण्यात येणार आहे.यावेळी पंचायत समिती सदस्य श्रीमती कविताताई सोनवणे,सरपंच श्रीमती सपनाताई ईनवाते , ग्राम पंचायत सदस्या श्रीमंती. लताताई बांते , छबिताताई मंगलदास मेश्राम, तृप्तीताई भोयर, कविताताई मेश्राम, एकनाथ सपाटे, ग्राम पंचायत सदस्य जियालाल कोकुडे , रमेश कानतोडे दिनेश शेंडे, हिरालाल बांते तसेच गावातील नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..





