26.5 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home विदर्भ जनआरोग्य केंद्र समितीची बैठक;ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्यसेवा देण्यावर भर

जनआरोग्य केंद्र समितीची बैठक;ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्यसेवा देण्यावर भर

0
58

 गोरेगाव. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तिल्ली/मोहगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जनआरोग्य केंद्र समितीची बैठक नुकतीच पार पडली.
बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य योजनांचा आढावा घेण्यात आला तसेच आरोग्य सेवा अधिक सक्षम व लोकाभिमुख करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी ग्रामीण नागरिकांना वेळेवर उपचार, आवश्यक औषधांचा साठा, स्वच्छ आरोग्य वातावरण, माता-बाल संगोपन सेवा, लसीकरण मोहिमा, संसर्गजन्य आजारांचे प्रतिबंध, कुपोषण निर्मूलन आणि आपत्कालीन आरोग्य सुविधांबाबत सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. तसेच रुग्णांना उपचारासाठी अनावश्यक अडचणींचा सामना करावा लागू नये आणि शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी आवश्यक – उपाययोजनांवर भर देण्यात आला.बैठकीत आरोग्य केंद्र परिसरातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रुग्णांसाठी सुविधा, औषध वितरण, तपासणी सेवा तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांची जबाबदारी यावरही चर्चा झाली. ग्रामीण भागात आरोग्य जनजागृती वाढविणे,महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि बालकांच्या आरोग्य संरक्षणासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच कुपोषणमुक्त गाव अभियान, अधिक प्रभावी राबविण्यावर भर देण्यात आला.

आरोग्यसेवांमध्ये कार्यक्षमतेला प्राधान्य
समिती सदस्यांनी नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित समस्या मांडत त्यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. आरोग्य सेवांमध्ये पारदर्शकता, शिस्त आणि कार्यक्षमतेला प्राधान्य देऊन सर्वसामान्यांचा विश्वास अधिक दृढ करण्यावरही भर देण्यात आला.

blank