राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२६ साठी विभागीय तपासणी समितीने केली पाहणी
अर्जुनी-मोर.दि.29-तालुक्यातील ग्रामपंचायत वडेगाव स्टेशनमध्ये ‘राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२६’ अंतर्गत ‘स्वच्छ व हरित गाव’ (Clean and Green Village) या संकल्पनेची क्षेत्रीय पडताळणी उत्साहात पार पडली.अमरावती विभागाच्या अप्पर आयुक्त (विकास) श्रीमती शालिनी अनिल कडू यांनी स्वतः गावाला भेट देऊन विविध विकासकामांची पाहणी केली आणि आपल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे विशेष कौतुक केले.
कचऱ्यातून कल्पकता (Reuse Material): गावात वेस्ट मटीरियलचा (Reuse Material) वापर करून बनवलेले मनमोहक देखावे आणि कलाकृतींनी समितीचे लक्ष वेधून घेतले. कचऱ्याचा असा कल्पक वापर कौतुकास पात्र ठरला.बोलक्या भिंती व पेंटिंग्स: गावातील भिंतींवर कोरलेल्या सुंदर आणि बोलक्या पेंटिंग्स (Paintings), जे गावाचे सौंदर्य अधिकच वाढवत आहेत, त्यांचे समितीने विशेष कौतुक केले. लोकसहभाग – श्रमदान: “आठवड्यातील एक तास गावासाठी” आणि “दर शनिवारी स्वच्छता अभियान” या उपक्रमांतून ग्रामस्थांनी दिलेले अभूतपूर्व योगदान आणि लोकसहभाग अधिकाऱ्यांच्या विशेष पसंतीस उतरला. एलईडी क्रांती (LED Lights): गावातील विद्युत खांबांवर लावलेले ९३ आकर्षक एलईडी (LED) लाईट्स, जे रात्री गावाला प्रकाशमान करतात, ते सर्वांच्या आकर्षणाचा विषय बनले. हरित वडेगाव स्टेशन: गावात २५,००० हून अधिक झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड आणि संवर्धनाचे काम सुरू आहे, ज्याचे समितीकडून विशेष कौतुक झाले. सुसज्ज MRF सेंटर: कचरा व्यवस्थापनासाठी बनवलेले अत्याधुनिक Material Recovery Facility (MRF) सेंटर आणि गावाची चकाचक स्वच्छता समितीला खूप आवडली. मनरेगातून रोजगार: मनरेगाअंतर्गत सर्वाधिक रोजगार निर्मितीची विशेष दखल घेण्यात आली.या महत्त्वपूर्ण पाहणीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक, गट विकास अधिकारी श्रीमती पल्लवी वाडेकर, तसेच विस्तार अधिकारी श्री. राणे व श्री. कन्नके प्रामुख्याने उपस्थित होते.हा सर्व ग्रामस्थ, महिला बचत गट, युवक आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या एकजुटीचा विजय आहे! आपला गाव शाश्वत विकासाच्या दिशेने असाच प्रगतीपथावर राहील.





