35.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ कलपाथरी येथे अग्नितांडव,पिडीतांना आर्थिक मदत

कलपाथरी येथे अग्नितांडव,पिडीतांना आर्थिक मदत

0
7

blank

गोरेगाव,दि.०९ : तालुक्याच्या कलपाथरी येथील गजानन हेमने यांच्या घराला रविवारी (ता. ७) मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत एकाच घरात मात्र, वेगवेगळ्या खोलीत राहत असलेल्या चार सदस्यांचे संसार आगीच्या भक्ष्यस्थानी आले. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी, लाखो रुपयांची वित्तहानी झाली.
वडील गजानन तुकाराम हेमने हे मुले राजकुमार हेमने, दिलीप हेमने आणि सुनील हेमने यांच्यासह एकाच घरात मात्र, वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहतात. रविवारी रात्री सर्वजण झोपेत असताना अचानक आगीने पेट घेतला. या आगीने क्षणात रौद्र रुप धारण केले आणि गजानन हेमने यांच्या खोलीसह तीनही मुलांच्या खोलीत पसरली. या आगीत घरातील धान्य, कपडे, फर्निचर, शेतीसाठी लागणारी साधने, महत्त्वाची कागदपत्रे तसेच इतर मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या.
स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव
घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीची तीव्रता मोठी असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार संबंधित कुटुंबांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.दरम्यान, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती डॉ. लक्ष्मण भगत,पंचायत समितीचे उपसभापती रामेश्वर महारवाडे,माजी सभापती मनोज बोपचे यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी पीडित कुटुंबांची सांत्वना करीत परिस्थितीची सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच नुकसानग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

blank