25.6 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home विदर्भ सुरजागड खाणीत पर्यावरणपूरक प्रतिज्ञा

सुरजागड खाणीत पर्यावरणपूरक प्रतिज्ञा

0
36

गडचिरोली,दि.०९ : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडद्वारे संचालित सुरजागड खाणीत ‘जागतिक पर्यावरण दिन २०२६’ उत्साहात साजरा करण्यात आला. पर्यावरण संवर्धन, शाश्वत जीवनशैली आणि निसर्गाप्रती सामूहिक जबाबदारी याबाबत जनजागृती करण्यासाठी येथे विविध उपक्रम पार पडले.कार्यक्रमाची सुरुवात चित्रकला स्पर्धेने झाली. यात कर्मचाऱ्यांनी कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास या विषयांवर आपल्या कल्पकतेतून स्वच्छ व हिरवेगार भविष्याची दृष्टी मांडली.’मिशन लाईफ’ प्रतिज्ञा घेत सकारात्मक बदलाचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला. वृक्षारोपण मोहीमही राबविण्यात आली. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

औद्योगिक क्षेत्रात हरित उपक्रम
हे सर्व उपक्रम लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. औद्योगिक क्षेत्रात हरित उपक्रम, जैवविविधता संवर्धन आणि जबाबदार खाणकामाला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे.या उपक्रमातून कर्मचारी आणि व्यवस्थापनाने स्वच्छ व शाश्वत भविष्यासाठी आपली सामूहिक वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली. कर्मचाऱ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जागृती निर्माण झाली.

blank