33.7 C
Gondiā
Sunday, June 28, 2026
Home विदर्भ भीमनगर-सिंगलटोली येथील प्रकरण : उड्डाणपूल बांधकामाची नागरिकांची मागणी

भीमनगर-सिंगलटोली येथील प्रकरण : उड्डाणपूल बांधकामाची नागरिकांची मागणी

0
12

गोंदिया : नागपूर-रायपूर रेल्वे मार्ग आणि गोंदिया-चंद्रपूर रेल्वे मार्गादरम्यान अडकलेल्या आंबेडकर वॉर्ड, सिंगलटोली व भीमनगरातील नागरिकांनी मोठ्या संख्येत एकत्र येऊन चंद्रपूर मार्गावर सुरू असलेले अंडरपासचे बांधकाम बंद पाडले. शनिवारी (दि.२७) घडलेल्या प्रकारानंतर वरिष्ठ अभियंता मल्लिकार्जुन राव यांनी घटनास्थळी भेट दिली असता नागरिकांनी आपली व्यथा मांडत उड्डाणपुलाची मागणी केली.
शहरातील आंबेडकर वॉर्ड, सिंगलटोली व भीमनगर हे क्षेत्र नागपूर-रायपूर रेल्वे मार्ग आणि गोंदिया-चंद्रपूर रेल्वे मार्गाच्या दरम्यान अडकलेले मोठ्या लोकसंख्येचे क्षेत्र आहे. या क्षेत्रात शाळा, डीएड-बीएड कॉलेज आणि लहान-सहान उद्योग आहेत. रेल्वेने पूर्वी नागपूर-रायपूर मार्गावर क्रॉसिंग बंद करून कमी उंचीचे अंडर पास दिले आहे. ज्यामुळे मोठ्या वाहनांचे फिरणे बंद झाले आहे. विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या बस, आपत्कालीन रूग्णवाहिका, आवास बांधणीसाठी ट्रक, जेसीबी, बोअरवेल मशीन, वीज विभागाची वाहने इत्यादींच्या येण्या-जाण्यात अडचण वाहने इत्यादींच्या येण्या-जाण्यात अडचण निर्माण झाली आहे.त्यामुळे भीमनगर रेल्वे क्रॉसिंगवरूनच ये-जा करता येत आहे. अशा परिस्थितीमध्ये आता चंद्रपूर रेल्वे मार्गावर अंडर पासचे बांधकाम सुरू करून जनतेवर अत्याचार, अन्याय करण्याचे कार्य रेल्वे करत असल्याचे जनतेच्या वतीने प्रतिनिधित्व करणारे सामाजिक कार्यकर्ते अमित भालेराव यांनी सांगितले, दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे लोकांची सुविधा न पाहता आवडीने कार्य करत आहे. अंडरपास बांधकाम सुरू करणे म्हणजे येथील जनतेवर अन्याय करणे आहे असेही त्यांनी सांगितले.
उड्डाणपुलाच्या मागणीला घेऊन डीआरएम नागपूर विभाग व जिल्हाधिकाऱ्यांना दोन वेळा पत्र दिले. मात्र त्याचा काहीच फायदा न झाल्याने अंडरपासचे बांधकाम थांबविण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचेही भालेराव यांनी सांगितले.तसेच लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून उड्डाणपुलाच्या बांधकामाची गोष्ट लक्षात आणून देत क्षेत्राच्या नागरिकांनी पाठवलेल्या पत्रांना गांभीर्याने घेत लवकरच एक उच्चस्तरीय बैठक
घेऊन समाधानकारक रस्ता शोधतील असे आश्वासन दिले.