24.9 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ फुलचूर ग्रामपंचायतमध्ये मान्सूनपूर्व आढावा बैठक

फुलचूर ग्रामपंचायतमध्ये मान्सूनपूर्व आढावा बैठक

0
57

गोंदिया : फुलचूर ग्रामपंचायत येथे मान्सूनपूर्व आढावा बैठकीचे आयोजन गुरुवारी (दि. २५) जि.प. सदस्य संजय टेंभरे यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले होते. बैठकीत प्रभाग क्रमांक १ ते ५ मधील साफसफाई व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, अतिक्रमण, बंद नाल्या, बंद नाला आणि पावसाळ्यात येणाऱ्या महत्त्वपूर्ण अडचणींवर चर्चा करण्यात आली. या समस्या मार्गी लावण्याचे निर्देश संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याप्रसंगी माजी सभापती स्नेहा गौतम, सरपंच मिलन रामटेककर, उपसरपंच सुरेश सोनवाने, सुकचंद येळे, दुर्गाप्रसाद नागपुरे, आम्रपाली उके, सुनीता लिल्हारे, किरण पटले, रविकांता नागपुरे, रोहिणी भांडारकर, ताराचंद नागपुरे, देवचंद बिसेन, महेश बंसोड, नरेश चौधरी, लोकेश उपराडे, महेन्द्र शहारे, सुरेन्द्र दमाहे, ग्रामविकास अधिकारी मेश्राम, डॉ. सोनाली गौतम, अनिल रहांगडाले उपस्थित होते.