27.4 C
Gondiā
Tuesday, June 30, 2026
Home विदर्भ कायद्याशी खेळ महागात पडेल, गुन्हेगारांनाही धडा शिकवणार!

कायद्याशी खेळ महागात पडेल, गुन्हेगारांनाही धडा शिकवणार!

0
11

नागपूर : नागपूर पोलिस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यावर विश्वास नांगरे पाटील यांनी शहरातील गुन्हेगारांना थेट इशारा दिला आहे. कायदा हाती घेणाऱ्यांना सोडणार नाही व गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीत राहूनच वठणीवर आणण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, पोलिसांशी वागणाऱ्यांची तमा बाळगणार नाही, असेदेखील त्यांनी बजावले. डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्याकडून सोमवारी पदभार स्वीकारल्यानंतर ते पत्रपरिषदेदरम्यान बोलत होते. अभद्र
यावेळी सहपोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, राजेंद्र दाभाडे, विनीता साहू, उपायुक्त दीपक अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते. नागपुरात अहोरात्र काम करण्यासाठी मी आलो आहे. महिलांचे संरक्षण आणि तरुणांना अंमली पदार्थापासून लांब ठेवणे या कामांना माझे प्राधान्य राहील. तसेच कायदा व सुव्यवस्था राखणे, कोअर पोलिसिंग करणे, महिला आणि लहान मुलांना सुरक्षित ठेवणे यावर भर असेल, नागपूरचे प्रश्न वेगळे आहेत व तेच डोळ्यासमोर ठेवून काम करण्यात येईल, असे विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.
पोलिसांवर होत असलेल्या हल्ल्यांसंदर्भात त्यांना विचारणा केली असता, मी सर्व पोलिस माझे कुटुंबीय मानतो. पोलिसांवर कोणी हात टाकणार असेल, तर तो माझ्यावर हात टाकला जात आहे, असे मी मानणार आणि त्यांचा योग्य समाचार घेण्यात येईल, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले.

गुन्हेगारच पोलिसांना घाबरले पाहिजेत
आमच्या खांद्यावर आयपीएस लिहिलेले आहे. त्यातील एस हे सर्व्हिस म्हणजेच लोकांच्या सेवेसाठी आहे. त्यामुळे फक्त गुन्हेगार हेच पोलिसांना घाबरले पाहिजेत. मी कुठलेही बनावट एन्काउंटर करणार नाही, पण गुन्हेगारांना सोडणारही नाही. सर्वसामान्य नागरिक हे पोलिसांना घाबरता कामा नये. मुख्यमंत्र्यांनी मला कामाचा रोडमॅप दिला आहे. त्यांचे प्राधान्यक्रम मला माहिती आहेत, असे विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले