26.4 C
Gondiā
Saturday, July 11, 2026
Home विदर्भ एसआयआर प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी;अॅडव्होकेट्स वर्किंग कमिटीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

एसआयआर प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी;अॅडव्होकेट्स वर्किंग कमिटीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
8

नागपूर : राज्यात सुरू असलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (एसआयआर) प्रक्रियेची प्रभावी, पारदर्शक व वेळेत अंमलबजावणी व्हावी, तसेच नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी एसआयआर अॅडव्होकेट्स वर्किंग कमिटी, नागपूरच्या वतीने नागपूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.निवेदनामध्ये एसआयआरबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबविणे, नागरिकांना अर्ज भरण्याबाबत योग्य मार्गदर्शन करणे, विधानसभानिहाय बीएलओ व हेल्पलाईन क्रमांक प्रसिद्ध करणे, बीएलओंना आवश्यक मनुष्यबळ व सहकार्य उपलब्ध करून देणे, बीएलओ मॅन्युअलचे काटेकोर पालन करणे, स्वयंसेवी संस्था व सामाजिक संघटनांचा सहभाग वाढविणे तसेच संपूर्ण प्रक्रियेचा नियमित आढावा घेण्याची मागणी करण्यात आली आहे.यावेळी अॅड. कमल सतुजा, अॅड. नितीन देशमुख, अॅड. विनोद खोबरे, अॅड. समीक्षा गणेशे, अॅड. जितेंद्र हिंगवे, अॅड. लक्ष्मी मालेवार, अॅड. जितेंद्र वेळेकर, अॅड. मोनाली अपर्णा, अॅड. रुचिता मुळे आणि अॅड. बागडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. एयआयआर अॅडव्होकेट्स वर्किंग कमिटीने एसआयआर जनजागृती नागरिकांमध्ये प्रक्रियेविषयी करण्यासाठी कार्यशाळा, मार्गदर्शन सत्रे व प्रशिक्षण उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प व्यक्त केला असून, प्रशासनाने निवेदनातील सूचनांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.