गोंदिया – सन 2024-25 या वर्षाचे राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार 5 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आले असून गोंदिया जिल्ह्यातून कमलेश बिसेन यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे.जिल्हा परिषद स्तरावर अति उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातून एक ग्रामपंचायत अधिकारी यांना शासन स्तरावरून यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात येतात. त्याच अनुषंगाने सन 2024-25 करिता गोंदिया जिल्ह्यातून गोंदिया तालुक्यातील रायपूर ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी कमलेश बिसेन यांची निवड करण्यात आली आहे.
कमलेश बिसेन हे गोंदिया ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष असून मागील अनेक वर्षांपासून ते संघटनेच्या कामात सक्रिय आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार मा. मंत्री ग्रामविकास व पंचायत राज यांच्या हस्ते यशवंत पंचायत अभियान पुरस्कार वितरण सोहळ्याच्या वेळी वितरीत करण्यात येतो.





