गडचिरोली दि.24 : ओबीसी कर्मचारी संघटनेचे तथा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी प्रा. शेषराव येलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसींची नियोजन सभा पार पडली. यात ८ डिसेंबर रोजी नागपूर येथील विधानभवनावर काढण्यात येणाऱ्या ओबीसींच्या विराट मोर्चात देसाईगंज तालुक्यातील हजारो ओबीसीबांधव जाणार असल्याचे निश्चित करण्यात आले.
सभेच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष धनपाल मिसार होते. प्रमुख अतिथी म्हणून ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक बांदूरकर, प्रा. हितेंद्र धोटे, प्रा. संजय कुथे, महेश झरकर, माजी जि. प. सदस्य रमाकांत ठेंगरे, प्रा. भाष्कर नरुले आदी उपस्थित होते.
२७ नोव्हेंबर रोजी रविवारला होणाऱ्या महिला अधिवेशनास महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने राहण्याबाबतही या सभेत चर्चा करण्यात आली. विधानभवनावर काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याबाबत नियोजन करण्यात आले. यासाठी रेल्वे, महामंडळाच्या बसेस, चारचाकी, दुचाकी वाहनांच्या माध्यमातून १ हजार पेक्षा ओबीसी बांधव देसाईगंज तालुक्यातून मोर्चात सहभागी होणार असल्याचे निश्चित करण्यात आले. सभेचे आयोजन लोकमान बर्डे यांनी केले होते.
सभेला नितीन राऊत, रमेश ठाकरे, गोपाल चौधरी, पंकज धोटे, गौरव नागपूरकर, सुनील पारधी, पं. स. सदस्य परशराम टिकले, पुरूषोत्तम दोनाडकर, शैलेश दुपारे, चैतनदास विधाते, प्रीती ठाकरे, किरण शेंडे, ज्ञानेश्वरी पत्रे, सुनीता कुंभलकर, विलास ठाकरे, नगरसेविका शालू दंडवते, उमेश हर्षे आदी उपस्थित होते.या सभेत प्रा. शेषराव येलेकर यांनी भारतीय संविधानाने दिलेले अधिकार व हक्क मिळविण्यासाठी ओबीसींनी एकजूट होऊन जागृत राहावे, आंदोलनात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.





