25 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ राजकारण्यांनी गोवारी समाजाला गृहित धरू नये

राजकारण्यांनी गोवारी समाजाला गृहित धरू नये

0
25

नागपूर दि.24 : : सरकार कोणत्याही पक्षाचे असो, मात्र आदिवासी गोवारी समाजाला अद्याप न्याय मिळाला नाही. २३ नोव्हेंबर १९९४ साली आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मोर्चा काढलेल्या ११४ बांधवांना चेंगराचेंगरीत मरण आले. या घटनेला २२ वर्षे लोटली. हा लढा त्यापूर्वीपासून सुरू असूनही समाजाची एक छोटीशी मागणी पूर्ण होत नाही. मात्र आता समाज जागा झाला आहे. राजकारण्यांनी या समाजाला आता गृहित धरू नये, असा इशारा गोवारी समाजबांधवांनी दिला.

आदिवासी गोवारी शहीद स्मारक समितीच्यावतीने आदिवासी गोवारी शहीद स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. प्रकाश खरात, आमदार प्रकाश गजभिये, चंद्रकांत वानखेडे, बाबा नाथेश्वर, कैलास राऊत, भास्कर राऊत, रमेश गजभे, शालिक नेव्हारे, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद काळबांडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. प्रकाश खरात व चंद्रकांत वानखेडे यांनी गोवारी समाजाला न्यायासाठी संघटित होण्याचे आवाहन केले. युद्धाचा शेवट होईपर्यंत गप्प बसू नका, असे आवाहन त्यांनी केले.

एवढी वर्षे लोटूनही आदिवासी गोवारी समाजाला न्याय मिळालेला नाही. भाजप-सेनेचे सरकार आले तरी समाजाच्या मागणीचा विचार केला जात नाही. सरकार गोवारीबांधवांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे. त्यामुळे निर्णायक लढाई लढावी लागेल, असा इशारा देत येत्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्याची घोषणा यावेळी समितीने केल्याचे कैलास राऊत यांनी सांगितले.

blank