24.1 C
Gondiā
Saturday, September 5, 2026
Home विदर्भ तिरोड्यात शिक्षक दिनी ‘गुरुजनांचा गौरव गुणवंत विद्यार्थ्यांचाही होणार सन्मान

तिरोड्यात शिक्षक दिनी ‘गुरुजनांचा गौरव गुणवंत विद्यार्थ्यांचाही होणार सन्मान

0
30

चित्रा कापसे/तिरोडा-शिक्षक दिनाचे औचित्य साधून तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयभाऊ रहांगडाले यांच्या आयोजनातून सेवानिवृत्त शिक्षक, आदर्श शिक्षक तसेच इयत्ता १० वी व १२ वीच्या शालांत परीक्षेत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता ड्रीम गार्डन लॉन, जी.टी. रोड, तिरोडा येथे आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र कोठेकर राहणार असून, कार्यक्रमाचे उद्घाटन विधानपरिषद सदस्य तथा माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी राज्यसभा सदस्य राजेंद्र जैन तसेच विधानपरिषद सदस्य, भंडारा-गोंदिया अविनाश ब्राह्मणकर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
शिक्षक हे समाजाच्या जडणघडणीतील महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार आणि जीवनाची दिशा देण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत मोलाची असते. अशा शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासोबतच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदर्श शिक्षकांचा आणि इयत्ता १० वी व १२ वीमध्ये प्रावीण्य मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
शिक्षकांच्या कार्याला प्रोत्साहन देणे, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करणे आणि समाजात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणे, हा या सत्कार समारंभामागील प्रमुख उद्देश आहे.या भव्य शिक्षक दिन सत्कार समारंभास सर्व शिक्षक बंधू-भगिनी, विद्यार्थी, पालक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजक आमदार विजय रहांगडाले यांनी केले आहे.