24.7 C
Gondiā
Friday, September 4, 2026
Home विदर्भ सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन;विकासकामांना गती देण्याचा संकल्प-जि.प.अध्यक्ष भेंडारकर

सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन;विकासकामांना गती देण्याचा संकल्प-जि.प.अध्यक्ष भेंडारकर

0
10

अर्जुनी-मोर. -तालुक्यातील बोंडगाव देवी येथे सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन  परिसरातील गणमान्य नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत गोंदिया जि.प.चे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी जिल्हा परिषद गोंदियाचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, “विकासकामे हीच गावाच्या प्रगतीची खरी ओळख असून, बोंडगाव देवीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या विकासकामांना प्राधान्य देऊन सातत्याने प्रयत्न केले जातील,” असा विश्वास व्यक्त केला.
गावातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी रस्ते, नाली, पाणी, शिक्षण तसेच इतर आवश्यक विकासकामांना चालना देणे गरजेचे आहे. नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन उपलब्ध निधीचा योग्य विनियोग करून विकासकामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यावर भर दिला जाईल, असेही भेंडारकर यांनी सांगितले.
या विकासकामामुळे नागरिकांची ये-जा अधिक सुलभ होणार असून, गावाच्या विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे. विकासकामाच्या भूमिपूजनामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.यावेळी पंचायत समितीचे उपसभापती संदीप कापगते, प्रशासक ए.सी. राणे, माजी जि.प. सदस्य श्यामकांत नेवारे, प्रशासकीय समिती सदस्य भाग्यवान फुल्लूके, श्रीकांत बनपूरकर, राधेश्याम झोळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष धम्मपाल वालदे, देवलाल मानकर, कृष्णा झोळे, रवी बनपूरकर, महादेव बोरकर, देवराव बोरकर, यादवराव बोरकर, घनश्याम बोरकर, उमेश उइके, पतिराम मेश्राम, भागवत लंजे, मुख्याध्यापक भोयर, पुरुषोत्तम डोये, मुख्याध्यापक अनिल कापगते, ग्रामविकास अधिकारी संतोष परमार, नरेंद्र मानकर, हंसराज पुस्तोडे, शुभम बोरकर, संजय कापगते, रणजीत रामटेके, विश्वनाथ मेश्राम, संजय गिऱ्हेपुंजे, शालिक बोरकर, राजेश झोळे, रामनाथ मेश्राम, कैलास मेश्राम, नासिक बोरकर, प्रमोद रामटेके, उमेश बोरकर, खुशाल बोरकर यांच्यासह अन्य मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.