भाजपकडून इंगळे,सेनेकडून रहागंडाले,राँकाकडून गप्पू तर काँग्रेसकडून ठाकूर नगराध्यक्षपदाचे उमेदवार

0
7

गोंदिया,दि.17 : गोंदिया नगर परिषदेसाठी नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी कुठल्याच पक्षामध्ये समेट न झाल्याने सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.विशेष म्हणजे भाजप वगळता काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना,बसपासह इतर पक्षांकडे उमेदवारांची वाणवा दिसून आल्याने उपविभागीय कार्यालयासमोर या पक्षाचे प्रमुख एबीफार्म घेऊनच उभे होते.ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्या सर्वांना आपआपल्याडे ओढून एबीफार्म देण्यात येत होते.विधानपरिषदेत भाजपसोबत गेलेल्या काँगेसने यावेळी सुध्दा अखेरच्या वेळी आपल्या हेकेखोरपणाचे दर्शन दाखवित आणि काँग्रेस म्हणजे माझ्या घऱचा गुलाम पक्ष अशी स्थिती करुन टाकलेल्या नेत्यांनी राष्ट्रवादीशी होणारी युतीच होऊ दिली नाही अशा चर्चा शहरात सुरु झाल्या आहेत.
आज शेवटच्या दिवशी शिवसेनेकडून दुर्गेश रहागंडाले,भाजपकडून अशोक इंगळे व राष्ट्रवादी काँग्रेसकडून गप्पू गुप्ता यांनी तर काँग्रेसकडून राकेश ठाकूर यानी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले.त्या आधी सहा उमेदवारानी अर्ज दाखल झाले होते.काँग्रेसकडून गोवींद शेंडे यांचे नाव जोरात सुरु होते परंतु अखेर शेंडे यांच्या आजपर्यतंच्या राजकीय स्थितीचा आढावा घेत काँग्रेस आमदारांनी त्यांचा पत्ता कट केला.सोबतच युवा उमेदवार म्हणून युवक काँग्रेसचे नेते राहिलेले अमर वराडे यांनीही मागणी केली होती परंतु वराडे यांनाही त्यांनी उमेदवारी दिली नाही.