नक्षल्‍यांनी पेरुन ठेवलेली १५ किलो स्फोटके जप्त

0
6

गडचिरोली,दि.२8: पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूने नक्षल्यांनी पेरुन ठेवलेली १५ किलो स्फोटके पोलिसांनी शिताफीने हुडकून काढून ती निकामी केली. यामुळे मोठा अनर्थ टळला.
आज पोलिस नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना आलापल्ली-भामरागड मार्गावरील मेडपल्ली गावाजवळ रस्त्यावरील पुलाच्या पाईपमध्ये नक्षल्यांनी पेरलेली स्फोटके आढळून आली. पोलिसांनी बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या जवानांना पाचारण केले. या पथकाच्या जवानांनी स्टीलच्या डब्यात ठेवलेली स्फोटके शिताफीने काढून ती निकामी केली. उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे जवान, पोलिस उपनिरीक्षक गजानन पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी पार पडली. परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.