भजेपारात प्रौढ महिला, पुरूष कबड्डी स्पर्धा ३१ पासून

0
6

नवयुवक कबड्डी क्लब आणि संवेदना बहुउद्देशिय संस्थेचा उपक्रम
सालेकसा,दि.28 :साकरीटोला जवळच्या भजेपार येथील संवेदना बहुउद्देशिय संस्था आणि नवयुवक कबड्डी क्लबच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर ३१ डिसेंबर २०१६ ते २ जानेवारी २०१७ दरम्यान तीन दिवसीय प्रौढ महिला व पुरुष कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली. महिला आणि पुरूष गटाला प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे १० हजार, ७ हजार आणि ४ हजारासह प्रोत्साहनपर अनेक पुरस्कार देण्यात येणार आहेत. आमदार संजय पुराम यांच्या हस्ते ठाणेदार मोहन खांदारे यांच्या अध्यक्षतेखाली कबड्डी स्पर्धेचे उद््घाटन ३१ डिसेंबरला सकाळी ११ वाजता होईल. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सभापती देवराज वडगाये, प्रभाकर दोनोडे, पं.स.सभापती हिरालाल फाफणवाडे, बबलू कटरे, जितेश राणे आदिंसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कबड्डी स्पर्धेत जिल्ह्यातील महिला आणि पुरूष खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन नवयुवक कबड्डी क्लब आणि संवेदना बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.