28.7 C
Gondiā
Monday, July 13, 2026
Home विदर्भ प्राणहिता नदीत बुडून शिक्षकाचा मृत्यू

प्राणहिता नदीत बुडून शिक्षकाचा मृत्यू

0
40

अहेरी,berartimes.com,दि.१७-: विद्यार्थ्यांसह सहलीला गेलेल्या शिक्षकाचा आंघोळ करताना तोल गेल्याने नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. राजन्ना चिलकामारी(४७) असे मृत शिक्षकाचे नाव असून, ते अहेरी येथील संत मानवदयाल प्राथमिक आश्रमशाळेत शिक्षक होते.
मूळचे सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा येथील रहिवासी असलेले श्री.चिलकामारी हे आज विद्यार्थ्यांना घेऊन अहेरीपासून जवळच असलेल्या प्राणहिता नदीवर सहलीला गेले होते. श्री.चिलकामारी हे आंघोळ करीत असताना तोल गेल्याने खोल पाण्यात बुडाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.