नवी दिल्ली,वृत्तसंस्था दि. १८ – देशातील सर्वोच्च पुरस्कार मानल्या जाणा-या ‘पद्म’ पुरस्कारांच्या यादीतील संभाव्य नावांची चर्चा सुरू झाली असून त्यामध्ये ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार तसेच ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही.सिंधू, साक्षी मलिक, गुगलचे सुंर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नाडेला तसेच पॅरालिम्पिकपटू दीपा मलिक यांची नावे आघाडीवर आहेत. ‘हिंदुस्थान टाईम्स’ या वृत्तपत्राने हे वृत्त दिले असून त्यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्या नावाचाही समावेश असल्याचे समजते. १७३० नामांकनांमधून सरकारने १५० मान्यवरांची नावे शॉर्टलिस्ट केली आहेत. ‘प्रजासत्ताक दिना’च्या पूर्वसंध्येला पुरस्काराने गौरवण्यात येणा-या व्यक्तींच्या नावांची घोषणा करण्यात येईल.
तर मनोरंजन क्षेत्रातून ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर, अभिनेत्री आशा पारेख, अभिनेता मनोज वाजपेयी, गायक-संगीत दिग्दर्शक शंकर महादेवन, सोनू निगम, कैलाश खेर यांच्या नावाचाही समावेश असल्याचे समजते.





