25.9 C
Gondiā
Saturday, July 11, 2026
Home विदर्भ सोनाली ढवस यंग सायंटिस्ट पुरस्काराने सन्मानित

सोनाली ढवस यंग सायंटिस्ट पुरस्काराने सन्मानित

0
31

चंद्रपूर दि. 20 – : स्थानिक चंद्रपूर येथील डॉ. सोनाली ढवस यांना फ्लोराईडच्या ३३ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वात उत्कृष्ट शोधनिबंध व त्यावरील प्रबंध वाचनाला प्रथम क्रमांक मिळाला आहे.
‘त्यात त्यांना युवा वैज्ञानिक’ या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. ही परिषद आंतरराष्ट्रीय दर्जाची असून त्यात भारत, चीन, जपान, इरान, थायलंड, श्रीलंका व अफगाणिस्तान अशा विविध देशांतील वैज्ञानिकानी भाग घेतला होता.त्यांचे संशोधन मानवास होणाऱ्या फ्लोराईड नावाच्या आजारावर सुरु असून त्यांचे विविध आठ आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शिका डॉ. वर्षा धुर्वे व आपल्या कुटुंबास दिले आहे.