जीडीसीसी बँकेने कामकाजात सुधारणा करावी

0
19

सालेकसा,दि.20-सालेकसा येथील गोंदिया जिल्हा डिस्ट्रीक्ट सेंट्रल को आॅफ बँकेच्या कारभारामूळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत असून बँक प्रशासनाने आपल्या कामकाजात सुधारणा करुन वेळखाऊपणा व त्रास देण्याचे धोरण बंद करण्यासंबधीचे निवेदन सालेकसा तालुका नियंत्रण कृती समितीच्यावतीने बँकेचे व्यवस्थापकांना देण्यात आले आहे.बँकेमध्ये गावखेड्यातून आलेल्या शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांकना सकाळी 11 वाजेपर्यंत विड्रालफार्म स्विकारुन त्यांना विड्राल मात्र सायंकाळी 5 वाजेपर्यंत देतात हा वेळ वाया घालविण्याचा प्रकार योग्य नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.500 रुपयासाठी पुर्ण दिवस खर्च घालावा लागत असून यात सुधारणा करण्याची विनंती समितीचे अध्यक्ष मोहनलाल क्षिरसागर,उपाध्यक्ष मनोज डोये,सचिव तेजराम चवरे,कोषाध्यक्ष विनोद जैन,प्रल्हाद वाढई,यशवंत शेंडे,गोपाल भदाडे,नेपाल पटले,राजीव फुंडे,सुरेंद्र डोये,कृष्णा पटले आदींनी केली आहे.