तुमसरात गोळी झाडून युवकाची हत्या

0
18

तुमसर दि. ३१ : तुमसर येथील दोघे मित्र भाजीबाजारातून जात असताना वनविभागाच्या कार्यालयासमोर अज्ञात व्यक्तीने देशी कट्टय़ातून गोळी झाडून हेमंत रामरतन उके (३४, रा. आंबेडकर वॉर्ड, तुमसर) याची सोमवारी रात्री ८.३0 वाजतादरम्यान हत्या केली. बाबू बॅनर्जी व हेमंत उके हे दोघेही मित्र भाजीबाजारातून वनविभागाच्या कार्यालयासमोरून जात होते. दरम्यान अज्ञात व्यक्तीने हेमंतवर गोळी झाडली. त्याच्या डोक्याला गोळी लागल्यामुळे तो जागीच ठार झाला; परंतु बाबू बनर्जी याने कसाबसा जीव वाचवून पोलीस ठाणे गाठून तुमसर पोलिसांत तक्रार दाखल केली. हेमंतला उपचाराकरिता तुमसर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेचा तपास तुमसर पोलीस करीत आहेत.