५३ सदस्यांची होणार गोंदिया जिल्हा परिषद

0
11

गोंदिया : राज्य निवडणूक आयोगाने गोंदिया व भंडारा जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येत असलेल्या १५ पंचायत समित्यांसाठी विभाग, गणरचना व आरक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. विशेष म्हणजे यामध्ये गोंदिया जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या एकाने वाढवून दिल्याने आता जिल्हा परिषद ५३ सदस्यांची होणार आहे. सन २०११ च्या जणगणनेच्या आधारावर निवडणूक आयोगाने सदस्यसंख्या निश्चित केली असून जिल्हा परिषदेचा प्रत्येक निवडणूक विभाग दोन निर्वाचक गणांमध्ये विभागण्यात येणार आहे.
सद्यस्थितीत गोंदिया पंचायत समितींतर्गत १२ जिल्हा परिषद सदस्य आहेत.आता 13 जि.प.सदस्य तर २४ पंचायत समिती सदस्य असून त्यात 2 सदस्याची वाढ होऊन 26 होणार आहे.राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेचा प्रत्येक निवडणूक विभाग दोन निर्वाचक गणांमध्ये वाढवून दिल्याने आता ही संख्या दोनने वाढणार असून २६ होणार आहेत.
19 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कायार्लयात 53 सदस्यासाठी आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे.त्यानंतर 22 जानेवारीपयर्ंत आक्षेप मागविण्यात येणार आहे.आक्षेपानंतर 15 फेबुवारीपयर्ंत अधिकृत मतदारसंघाची अधिसुचना जाहिर करणअयात येणार आहे.
येत्या ११ जुलै २०१५ रोजी गोंदिया व भंडारा या दोन जिल्हा परिषद व त्याअंतर्गत १५ पंचायत समित्यांची मुदत संपणार आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणूकपूर्व कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये आयोगाने सन २०११ च्या जणगणनेच्या लोकसंख्येच्या आधारे हा कार्यक्रम हाती घेतला आहे. यात सन २०११ च्या जणगणने ११ लाख ६४ हजार ५१३ एवढी लोकसंख्या आहे. यामध्ये एक लाख ४५ हजार ८८ अनुसुचित जाती व दोन लाख आठ हजार ६०१ अनुसुचित जमातीची लोकसंख्या आहे.

निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या ५३ सदस्य संख्येनुसार यात २७ जागा महिलांसाठी राखीव राहणार आहेत. यात खुल्या प्रवर्गातील २३ जांगापैकी ११, अनु.जाती प्रवर्गातील सात पैक चार, अनु. जमाती प्रवर्गातील नऊ पैकी पाच तर इतर मागास प्रवार्गासाठी असलेल्या १४ जागांपैकी सात अशाप्रकारे एकूण २७ जागा महिलांसाठी आरक्षीत करण्यात आल्या आहेत. यामुळे महिला सदस्य संख्या एकने वाढली आहे.